प्रजासत्तादिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखणे आणि शासनाने बंदी घातलेले प्लास्टिकचे ध्वज विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय प्रतिकाविषयी जागृती करणे यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या आणि सनातन संस्था वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासनाला आणि गटशिक्षण अधिकारी, तसेच माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले की , राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता ! मात्र दुर्दैवाने याचे स्मरण केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशीच बहुतांश भारतियांना होते अन् या दिनी राष्ट्रध्वज मोठया अभिमानाने मिरवले जातात. हेच प्लास्टिकचे छोटे छोटे राष्ट्रध्वज त्याच दिवशी सायंकाळपासून रस्त्यावर, कचऱ्यात, गटारात आदी ठिकाणी पडलेले आढळतात. प्लास्टिकचे ध्वज तर लगेच नष्टही होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजांची विटंबना पाहावी लागते. राष्ट्रध्वजाची अशा प्रकारे होणारी विटंबना रोखण्यासाठी हिंद जनजागृती समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका (१०३/२०११) दाखल केली होती. याविषयी सुनावणी करतांना न्यायालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाला आदेश दिले आणि त्यानुसार केंद्रीय आणि राज्य गृह विभाग, तसेच शिक्षण विभाग यांनी याविषयीचे परिपत्रकही काढले तसेच काही जण तिरंग्याच्या रंगाप्रमाणे स्वतःचा चेहरा रंगवतात. काही जण राष्ट्रध्वजाच्या रंगातील कपडे घालून फिरतात, हेच कपड़े मळतात. खराब होतात, यांमुळेही राष्ट्रध्वजाचा अवमानच होतो. अशाकृतीमळे प्रजासत्तादिनी आणि स्वातंत्र्यदिनीच राष्ट्रध्वजाचा घोर अवमान सरसपणे केला जात आहे. तरी राष्ट्रध्वजाचा अवमान वा विटंबना होईल, अशा कृती नागरिक तसेच शाळेतील विद्याथ्यांकडून होऊ नये,
२६ जानेवारी निमित्त होणारे गैरप्रकार टाळण्यासंदर्भात कुडाळ येथे नायब तहसीलदार श्री. के एम दाभोलकर ,कुडाळ पोलीस स्टेशनला हवालदार श्री. मंगेश शिंगाडे,कुडाळ हायस्कुलला प्राचार्य श्री. सतीश वालावलकर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी श्री. देवेश रेडकर, श्री. आनंद नाईक, श्री. पांडुरंग तेंडोलकर, श्री. संजोग साळसकर, श्री. अमेय तुळसकर, श्री गुरूदास प्रभू उपस्थित होते.