दोडामार्ग /-
दोडामार्ग तालुक्यात मणेरी येथे चक्क विहिरीत मगर आढळून आली आहे. शेत वस्तीत मगरीचा उपद्रव दिसून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मणेरी तळेवाडी येथे यशवंत परब यांच्या शेतात विहिरीत मगर आढळून आली. परब हे शेतात गेले असता विहिरीमध्ये आवाज येऊ लागला त्यांना काहीच समजेनासे झाले त्यांनी सर्पमित्र युवराज येनापुरकर व राहुल निरलगी यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता मगर दिसून आली विहिरीत पाणी जास्त असल्याने त्यांनाही काही करता येत नव्हतं त्यांनी ही कल्पना वनविभागाला दिली. तात्काळ वनविभागाचे कर्मचारी व कुडाळ येथील अनिल गावडे व त्याची रेस्क्यू टीम त्या ठिकाणी सकाळी दहा वाजता दाखल झाली अथक प्रयत्नानंतर तीन वाजता मगरीला पकडण्यात आले. वनविभागाकडून सुरक्षित ठिकाणी मगरीला सोडण्यात येईल असे सांगण्यात आले.