कोल्हापूर /-
राधानगरी तालुक्यातील चंद्रे ग्रामपंचायत हद्दीतील जिवबाचीवाडी कडे जाणारा रस्ता जोतिर्लिंग डेअरी जवळ अतिवृष्टी पावसाने शेतीतील पाणी ,मेनरोड रस्त्यावरून पाणी या रस्त्यावर उतरले यामुळेच रस्ता धुवून खचला आहे तसेच सुमारे १७०मीटर रस्त्याला मोठी भेग पडली .रस्त्याचे मोठे नुकसान झाले आहे अवजड वाहतुकीसाठी रस्ता निकामी झाला आहे. फक्त पायवाटच वापर करु शकतो. या रस्त्याचा पंचनामा करून त्वरित नुतनीकरण आणि संरक्षित भिंत बांधण्याची मागणी होत आहे.
याबाबत ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील म्हणाले. हा रस्ता पुर्वी शेतीकरिता वापरण्यासाठी श्रमदानातून केला होता .नंतर या भागात लोकवस्ती वाढली. सद्या सुमारे पन्नास साठ घरे बांधली आहेत.३५० लोकसंख्या आहे. नेहमीच ये जा ची वर्दळ असते. या रस्त्याचे खासदार सदाशिव मंडलिक आणि आमदार प्रकाश आबिटकर यांच्या फंडातून डांबरी रस्ता झाला आहे. मात्र रस्त्याच्या सुरुवातीला जोतिर्लिंग डेअरी जवळ रस्त्याच्या पुर्वेला बारा फुट खोल शेती असल्याने वारंवार रस्ता खचत असतो आता या अतिवृष्टीमुळे तो पुर्ण खचला आहे. या रस्त्यावरुन ऊस वाहतूक ,अन्य अवजड वाहने नेऊ शकत नाही येथील नागरिकांची व शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे तरी लोकप्रतिनिधी आणि बांधकाम खात्याने याकडे लक्ष देवून रस्ता दुरुस्ती व संरक्षित भिंत बांधावी .
घटनास्थळी गावकामगार तलाठी अशोक पाटील यांनी पाहणी केली. पंचनामा करुन शासनास पाठवतो असे सांगितले तर यावेळी ग्रा.प.सदस्य सचिन पाटील, माजी सरपंच साताप्पा पाटील, भाजप युवा नेते महेश पाटील, शंकर पाटील, विठ्ठल हळदकर ,अनिकेत पाटील,हिंदूराव गोंगाणे, खेबुडकर,सागर जाधव,अरुण पाटील आदी सह जिवबावाडी चे नागरिक उपस्थित होते.
या रस्त्याच्या संरक्षित भिंत व्हावी अशी मागणी जिवबाचीवाडी येथील नागरिक आणि शेतकरी यांनी लोकप्रतिनिधी, बांधकाम विभाग, ग्रामपंचायत यांच्या कडे वारंवार करत होते. याकडे दुर्लक्ष झाले आहे. सद्यस्थितीत गांभीर्याने लक्ष देवून आणखीन नुकसान होण्यापूर्वी लवकरात लवकर नुतनीकरण आणि संरक्षित भिंत व्हावी अशी मागणी शेतकरी आणि नागरिकांच्याकडून होत आहे
याचबरोबर या मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिवृष्टीमुळे चंद्रे येथील अनेक घरांची पडझड झाली आहे यामध्ये रघुनाथ गोविंद पाटील यांच्या घराचे जास्त मोडतोड झाली आहे. सुमारे १८००००किमतीचे नुकसान झाले आहे यांचे तलाठी अशोक पाटील यांनी पंचनामे केलेले आहेत. या नुकसान ग्रस्त नागरिकांनीही भरपाईची मागणी केलेली आहे.