चल यार, धक्का मार !

चल यार, धक्का मार !

मसुरे /-

कोरोना काळात बंद असलेली एसटी अनलॉक नंतर धावू लागली खरी परंतु जिल्ह्यातील एसटी मुंबई येथे पाठविल्याने बऱ्याच फेऱ्या सध्या बंदच आहेत. बहुतांशी शाळा, कॉलेज चालू होऊन सुद्धा ग्रामीण भागाची वाहतुकीची रक्त वहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटी बस काही गावांनी अद्यापि फिरकलीच नाही आहे. मुळात वेळेचे गणित बिघडलेले असतानाच स्टार्टर लागत नसल्याने अशी एखादी बस भर रस्त्यातच बंद पडली तर ? सागरी महामार्गावरील रहदारीच्या मार्गावर सोमवारी सकाळी मालवण कडे जाणारी विजयदुर्ग- देवगड बस आचरा तिठा येथे भर रस्त्यातच बंद पडली. अखेर ग्रामस्थांनी एसटीला धक्का देत चालू करत पुढील प्रवासासाठी बस मार्गस्थ केली. एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गाड्यांच्या नियमित तपासणीकडे सुद्धा लक्ष देणे तितकेच महत्वाचे बनले आहे.

अभिप्राय द्या..