आचऱ्यात सागर सुरक्षा अंतर्गत चोख बंदोबस्त..

आचऱ्यात सागर सुरक्षा अंतर्गत चोख बंदोबस्त..

आचरा /-

सागरी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सागर सुरक्षा मोहिमेला मंगळवारी प्रारंभ झाला. यात आचरा भागात 3 अधिकारीसह पोलिस कर्मचारी, पोलिस पाटील व सागर सुरक्षा रक्षक सहभागी झाले आहेत.सिंधुदूर्ग पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आचरा पोलीस ठाण्यातचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामराव काळे ही मोहीम राबवित आहेत .
या मोहिमेअंतर्गत कालावल,आचरातिठा, आचरा ग्रामपंचायत, वायंगणी नाक्यावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येकवाहनाची कसून तपासणी होताना दिसत होती.आचरा बंदर येथील टॉवरवर स्वतः सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामराव काळे लक्ष ठेवून होते. आचराबंदरातून काही तुरळक मच्छिमार मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. त्यांचीही कसून तपासणी होत होती. संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवण्यात आले होते. मुख्य रस्त्यावर वाहनांची कसून तपासणी करण्यात येत होती.

अभिप्राय द्या..