काळसे , धामापूर, आंबेरी मध्ये महसूल विभागाची धडक कारवाई.;नदीकिनारी रॅंप केले उध्वस्त..

काळसे , धामापूर, आंबेरी मध्ये महसूल विभागाची धडक कारवाई.;नदीकिनारी रॅंप केले उध्वस्त..

चौके /-

मालवण तालुक्यातील काळसे धामापूर येथे होत असलेल्या अनधिकृत वाळू उत्खनना विरोधात महसूल विभागाने आज सोमवार दिनांक ११ जानेवारी रोजी दुपारी कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईदरम्यान काळसे बागवाडी येथील २ रॅंप , धामापूर येथील ४ रॅंप आणि आंबेरी मळा येथील ४ रॅंप पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने उध्वस्त करण्यात आले. याव्यतिरिक्त काळसे नमसवाडी येथील रॅंपही दोन दिवसांपूर्वी महसूल विभागाच्या टीमने उध्वस्त केले होते
मालवण तहसीलदार सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेरी मंडळ अधिकारी अनिल पवार आणि काळसे तलाठी निलम सावंत यांनी सदर कारवाई केली. या धडक कारवाई मध्ये पोलीस अंमलदार एस. बी. पूटवाड, आंबेरी पोलीस पाटील दिलीप राऊत, काळसे पोलीस पाटील विनायक प्रभु , काळसे कोतवाल प्रसाद चव्हाण , नांदरुख कोतवाल स्वप्नील साळकर हे सुध्दा सहभागी झाले होते.

अभिप्राय द्या..