कळणे-सडा येथे कारचा अपघात गाडीचे मोठे नुकसान.;सुदैवाने जीवितहानी नाही..

कळणे-सडा येथे कारचा अपघात गाडीचे मोठे नुकसान.;सुदैवाने जीवितहानी नाही..

दोडामार्ग /-

दोडामार्ग च्या दिशेने जाणाऱ्या कारला समोरून येण्याऱ्या डंपरने हुल दिल्याने झाल्याने गाडीतील वृद्धेसह दोघेजण जखमी झाले.हा अपघात कळणे सडा येथील अवघड वळणांवर झाला.सुदैवाने या अपघातात मोठी दुर्घटना टळली. याबाबत अधिक माहिती अशी की,कुडाळ येथील कुटुंबीय तिलारी येथे आपल्या कारमधून(एम.एच.०७ एजी २३९०) जात होते.कळणे सडा येथील अवघड वळणावर ही कार आली असताना समोरून येणाऱ्या डंपरने हुल दिल्याने ही कार नजीकच्या घळणीत जात अपघातग्रस्त झाली.या अपघातात कारमधील दोघेजण किरकोळ जखमी झाली.या जखमींना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..