ज्ञानभारती स्कॉलर ऑफ द क्लास ऑनलाईन स्पर्धेचा निकाल जाहीर..

ज्ञानभारती स्कॉलर ऑफ द क्लास ऑनलाईन स्पर्धेचा निकाल जाहीर..

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्गच्या वतीने आयोजन..

मसुरे /-

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्गच्यावतीने इ ३री ते ८ वी च्या विद्यार्थ्यासाठी ज्ञानभारती स्कॉलर ऑफ द क्लास या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर ऑनलाईन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री. विनीत देशपांडे,भागवत अवचार, दिनकर शिरवलकर, कृष्णा कालकुंद्रीकर,विठठल शिंदे, महेश कदम,शितल परुळेकर, वैशाली घोडके,सिद्धार्थ नेरुरकर, तुकाराम खिल्लारे, दयाळ मेस्त्री, विकास कपाटे, विनेश जाधव, संजय जाधव, सचिन डोळस यांनी विशेष मेहनत घेतली
शिक्षक भारतीच्या या उपक्रमाचे शिक्षक विद्यार्थी तसेच पालक वर्गातून कौतुक करण्यात आले असून ही स्पर्धा दरवर्षी घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. ही स्पर्धा यशस्वी झाल्याबद्दल प्राथमिक शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष श्री संतोष पाताडे, सचिव अरुण पवार, महिला आघाडी अध्यक्षा श्रीम. आशा गुणीजन यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले आहेत.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे
*इयत्ता-तिसरी*
प्रथम- वाघमारे तृप्ती नागोराव (त्रिंबक बगाडवाडी ता. मालवण)
द्वितीय- शिंगाडे अनुष्का तानाजी (जि.प. शाळा मोचेमाड, ता. वेंगुर्ले)
तृतीय -परुळेकर चैतन्य सुहास (जि.प.केंद्रशाळा परुळे नं. ३ ता. वेंगुर्ले)
*इयत्ता- चौथी*
प्रथम- महाजन वेदांत संतोष (जि.प.प्रा. शाळा असरोंडी नं. २ ता.मालवण)
द्वितीय- धुरी रुशील सुशांत (जि.प. शाळा वेंगुर्ले नं. १ ता.वेंगुर्ले)
तृतीय-कोकरे सार्थक मंगेश (जि.प.प्रा. शाळा असरोंडी नं. २ ता.मालवण)
*इयत्ता-पाचवी*
प्रथम- मेस्त्री मनीष रवींद्र (जि.प. शाळा वजराट नं. १ ता. वेंगुर्ला)
द्वितीय-सावंत वैष्णवी सीताराम ( जि.प. शाळा वजराट नं. १ ता.वेंगुर्ल
तृतीय- मसुरकर तनुश्री प्रसाद (जि.प. शाळा नवीन कुर्ली वसाहत, फोंडाघाट ता. कणकवली)
*इयत्ता- सहावी*
प्रथम -बांदेकर अथर्व भारत (जि.प. प्रा. शाळा बांदा नं. १ ता. सावंतवाडी)
द्वितीय- चांदरकर श्रेया समीर (वराडकर हायस्कूल, कट्टा ता.मालवण)
तृतीय- गावडे अथर्व प्रदीप (वेंगुर्ला हायस्कूल ता.वेंगुर्ला)
*इयत्ता- सातवी*
प्रथम- वजराटकर वैभवी दीपक (जि.प. शाळा वजराट नं. १ ता.वेंगुर्ला)
द्वितीय- गावडे देवदत्त धनंजय (वराडकर हायस्कूल, कट्टा ता. मालवण)
तृतीय- परब अक्षय अमोल (अॅड. गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कूल, माळगाव ता.मालवण)
*इयत्ता- आठवी*
प्रथम- गावडे चैतन्य प्रदीप (मिलाग्रीस हायस्कूल ता.सावंतवाडी)
द्वितीय- काशीद शर्वरी अण्णासाहेब (श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगाव ता.कुडाळ)
तृतीय-अटकेकर कृष्णकांत राजेश (शिवाजी इंग्लिश स्कूल, पणदूर तिठा ता.कुडाळ)
या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्याना प्रथम क्रमांक १००१ रु व चषक द्वीतीय क्रमांक ७०१ रु व तृतीय क्रमांक ५०१ रू तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना डिजीटल प्रमाणपत्र वाटप दिनांक १९ जानेवारी २०२१ रोजी केले जाणार आहे.

अभिप्राय द्या..