सरकारला हिंदूंची मंदिरे हवी असतील, तर त्यांनी सर्वप्रथम भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे ! – एम्. नागेश्‍वर राव, ‘सीबीआय’चे माजी प्रभारी संचालक..

वर्ष २०२० मध्ये आंध्र प्रदेश राज्यात मंदिरातील तोडफोडीच्या 228 घटना घडल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक यांनी सांगितले आहे. या हिंदूविरोधी घटनांमागे एक नियोजित षड्यंत्र आहे. खरे तर सरकारने सर्व धर्मियांना सुरक्षा पुरवली पाहिजे; मात्र सरकार एका विशिष्ट धर्माकडे झुकलेले दिसते. हे धर्मनिरपेक्षतेचे लक्षण नाही. आंध्र प्रदेश सरकारने कब्जा केलेल्या 24,632 मंदिरांच्या रक्षणासाठी हिंदु समाजाने संघटित होऊन ‘शॅडो कॅबिनेट’प्रमाणे प्रत्येक मंदिरात ‘शॅडो’ न्यास स्थापन करून लढा दिला पाहिजे. वास्तविक धर्मनिरपेक्ष सरकारला हिंदूंची मंदिरे बळकावण्याचा काहीएक अधिकार नाही. जर सरकारला हिंदूंची मंदिरे हवी असतील, तर त्यांनी सर्वप्रथम या देशाला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे आणि मग मंदिरांचा कारभार पाहावा, असे परखड मत *भारतीय पोलीस सेवेतील माजी अधिकारी तथा ‘सीबीआय’चे माजी प्रभारी संचालक श्री. एम्. नागेश्‍वर राव* यांनी या वेळी व्यक्त केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ या कार्यक्रमांतर्गंत ‘आंध्र प्रदेशातील मंदिरांवर आघातांचे षड्यंत्र ?’ या विषयावरील विशेष परिसंवादात ते बोलत होते. फेसबूक आणि यू-ट्यूब यांच्या माध्यमांतून हा कार्यक्रम 44,496 जणांनी पाहिला.

या वेळी *तेलंगणा राज्यातील प्रज्ञा भारतीचे राज्य उपाध्यक्ष श्री. गिरिधर ममिडी* म्हणाले की, गोव्यात पोर्तुगीज राजवट असतांना सेंट झेवियर म्हणत असे की, ‘ज्या वेळी लहान मुले घरात आई-वडिलांनी पूजलेल्या मूर्ती फोडल्याचे येऊन मला सांगतात, तेव्हा मला खूप आनंद होतो.’ अशा विचारसरणीचे लोक या मूर्तीभंजनाच्या मागे आहेत. राज्य सरकार या घटना रोखत नसेल, तर केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा; तसेच हिंदूंनीही या विषयावर देशभर जागृती केली पाहिजे. *तेलंगणा येथील राष्ट्रीय शिवाजी सेनेचे अध्यक्ष श्री. श्रीनिवास चारि* म्हणाले की, आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मूर्तीभंजन रोखण्याचे आश्‍वासन दिल्यानंतरही 4 ठिकाणी मूर्तीभंजन झाले आहे. त्यामुळे आमचा सरकारवर विश्‍वास राहिलेला नाही.

*हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे* म्हणाले की, आंध्र प्रदेशात सरकार मंदिरांचे कोट्यवधी रुपये घेते, तर मंदिरांना सुरक्षा का पुरवली जात नाही. दोनशेहून अधिक मंदिरांत एकाच पद्धतीने आघातांच्या घटना घडतात, तेव्हा ते हिंदूंच्या श्रद्धांचे हनन करण्याचे सुनियोजित षड्यंत्र आहे, हे सरकारला का कळत नाही ? मागे गोव्यातही अशाच प्रकारे अनेक मंदिरांत मूर्तीभंजनाच्या घटना घडल्या होत्या. कर्नाटकात ५-६ चर्चवर केवळ दगडफेकीच्या घटना घडल्यानंतर भारतातील चर्च धोक्यात असल्याचा प्रचार करून आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवला गेला; पण शेकडो मंदिरांवर आक्रमणे होऊनही त्याला गांभीर्याने घेतले जात नाही ! त्यामुळे हिंदूंनीच यावर आवाज उठवून सरकारला कृती करण्यास भाग पाडले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page