कुडाळ /-
केंद्रातील भाजप सरकारने भरमसाठ पेट्रोल डिझेलचे दर वाढवून देशभरातील जनतेसमोर महागाईचा आगडोंब उभा करून सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचे जे पाप करत आहे.त्याचा हिशोब महागाईने होरपळत असलेली जनता योग्य वेळी मतपेटीतून अद्दल घडवेल.
देशातील जनता गेले दहा महिने कोरोना व्हायरसचा मुकाबला करत आहे.कोरोना व्हायरस मुळे सर्व सामान्य नागरिकांचे जनजीवन पूर्णतःहा विस्कळीत झाले आहे.छोटे मोठे उद्योग व्यापार पूर्णपणे ठप्प झाले असून जनता मायबाप सरकारकडे मदतीची अपेक्षा करत असताना भाजपचे केंद्रातील सरकार सतत इंधन दरवाढ करून जनतेला कंगाल करण्याचेच निर्णय घेऊन देशातील जनतेला देशोधडीला लावण्याचे पाप करत आहे. केंद्र सरकार हे गरिबांचे नसून धनदांडग्यांच्या इशारावर चालणारे सरकार आहे.या सरकारला सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांची कदर राहिलेली नाही. अशा या जनता विरोधी सरकारला केंद्रीय सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही.
देशात भरमसाठ केलेल्या इंधन दरवाढीमुळे महागाईचा आगडोंब उसळलेला निषेधार्ह असून त्याचा परिणाम येथील जनतेला भेडसावत आहे.याचा निषेध म्हणून सिंधूदूर्ग जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून लवकरच आंदोलन छेडण्याचा इशारा युवक जिल्हाध्यक्ष मा. प्रफुल्ल सुद्रिक यांनी दिला आहे.