कुडाळ /-
कुडाळ तालुक्यातील आगामी नऊ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कुडाळ तालुक्यात गुरूवारी निवडणूक होणार्या ग्रामपंचायतींच्या भागात पोलिसांनी संचलन केले.यात पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.कुडाळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी होत आहेत.या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.कुडाळ तालुक्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आकेरी,गोठोस,वाढोस,मोरे,आंबेरी या गावांमध्ये कुडाळ पोलिसांच्या पथकाने संचलन केले. यावेळी कुडाळ पोलिस निरीक्षक शंकर कोरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक डुमिंग डिसोझा यांच्यासह ४० पोलीस कर्मचार्यांनी यात सहभाग घेतला होता अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.