सावंतवाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीत सेनेची गद्दारी.;तालुका काँग्रेस उपाध्यक्ष सच्चिदानंद बुगडे यांचा आरोप

सावंतवाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीत सेनेची गद्दारी.;तालुका काँग्रेस उपाध्यक्ष सच्चिदानंद बुगडे यांचा आरोप

तळवडे ग्रामपंचायत निवडणुकीत, काँग्रेस महाविकास आघाडीत नाही.. अलिप्त धोरण

सावंतवाडी /-

तळवडे शिवसेना पदाधिकारी तोंडवर एक बोलतात आणी करतात दुसरेच,याचा प्रत्यय आम्हाला या ग्रामपंचायत निवडणुकीत आला.त्यामुळे आम्ही महाविकास आघाडी पासून फारकत घेत..अलिप्त रहायचे ठरवले आहे.. तळवडे ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस शिवसेने सोबत नाही असे सावंतवाडी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष सच्चिदानंद बुगडे यांनी जाहीर केले आहे.
सेनेने काँग्रेसचे ठरलेले उमेदवार ऐनवेळी दगाबाजी करत आपल्या पँनलमधे घेत विश्वासघात केला असा आरोप ही बुगडे यांनी करत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांना आवाहन करत भविष्यातील सोसायटी, जिल्हा बँक, पंचायत समिती,जिल्हा परिषद निवडणुका सेनेच्या गद्दारी, विश्वासघात या कार्यशैली मूळे स्वतंत्र पणे लढवाव्यात असे मत व्यक्त केले.

अभिप्राय द्या..