कुडाळ /-
पावशी हदिदतील मुंबई- गोवा महामार्गाच्या प्रलंबित कामे दि. २५ जानेवारी पर्यंत पूर्ण न झाल्यास पावशी पंचक्रोशीतील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थं दि.२६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणास करतील असा इशारा पावशी सरपंच बाळा कोरगावकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला.
या निवेदनात बाळा कोरगावकर यांनी नमुद केले की, पावशी हदिदतुन जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाची बरीचशी कामे सबंधित ठेकेदार व हायवे प्रशासन विभाग यांच्या हलगर्जीपणामुळे प्रलंबित राहिल्याने त्यांचा सर्वानाच त्रास होत आहे. याकडे संबंधित ठेकेदार तसेच हायवे प्रशासन बांधकाम विभाग यांच्याशी वारंवार संपर्क साधुनही आमच्या पावशी गावातील महामार्ग संलग्न बरीचशी कामे अपुरी ठेवलेली आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना तसेच इतरांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याबाबत अदयाप पर्यंत सबंधिताकडुन पुर्तता करण्यात आलेली नाही.
पावशी हद्दीतील अतिआवश्यक तसेच ग्रामस्थांच्या सोयी-सुविधा बाबत विचार करता येथील पर्यायी मार्गाची व्यवस्था करणे गरजेचे आहे कारण भंगसाळ नदी लगत महामार्गाला संलग्न पूर्वेच्या दिशेला पावशी, आंबडपाल, मुळदे, मांडकुली, वारंगाची तुळसुली, केरवडे, घावनळे अश्या सहा गावाना जोडणारा मुख्य रस्ता असुन सदर रस्त्यावरुन सदयस्थितीला ये-जा करणे फार मुश्किल झालेले आहे. त्याठिकाणी महामार्गाला ये ५६ महामार्गाच्या दुतर्फा ये-जा करण्यासाठी कोणतीही कायम स्वरुपी स्रस्था नसल्याने फार मोठी गैरसोय निर्माण झालेली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
तसेच अंतर्गत रस्ते जोडणी, बस थांबा, पर्यायी मार्ग, संलग्न रस्ते, माती उत्खन्नन, पाण्याची लाईन दुरुस्ती करणे व पावशी धरणातील गाळ उपसा करणे ही कामे पुर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे सदरची कामे दि. २५ जानेवारी पर्यंत पूर्ण न झाल्यास या पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, सदस्य व तमाम ग्रामस्थं दि.२६ जानेवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणास करतील असा इशारा कोरगावकर यांनी दिला आहे.