चिंदर तेथील शिवसैनिकांनी गरीब वयोवृद्ध महिलेला दिले स्वखर्चाने वीज कनेक्शन..

चिंदर तेथील शिवसैनिकांनी गरीब वयोवृद्ध महिलेला दिले स्वखर्चाने वीज कनेक्शन..

आचरा /-

चिंदर पडेकाप येथे माळरानावर राहणारी सुगंदा जंगले या वयोवृद्ध महिलेकडे गेली कित्येक वर्षे वीज कनेक्शन नव्हते ही महिला दिव्याचा आधार घेऊन राहत असे. चिंदर येथील शिवसैनिकांमुळे आज तिला वीज कनेक्शन मिळाले असून तिचे घर लाईटच्या उजेडात प्रकाशमान झाले आहे.

चिंदर पडेकाप येथे माळरानावर राहणारी सुगंदा जंगले यांच्या घरात लाईट कित्येक वर्षे नसल्याची खंत त्यानी समीर हडकर यांना बोलून दाखवली होती. समीर हडकर यांनी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून त्यांना नवीन वीज कनेक्शन घेऊन दिले आहे. त्यांच्या घरात वीज कनेक्शन देऊन लाईट चालू करताना समीर हडकर यांच्या समवेत चिंदर माजी उपसरपंच अनिल गांवकर, प्रकाश वराडकर, पपू परुळेकर, प्रकाश वराडकर, वागोबा जंगले, गणेश जंगले, विजय जंगले, आदी उपस्थित होते

फोटो
गरीब वयोवृद्ध महिलेला वीज कनेक्शन चिंदर येथील शिवसैनिकांनी स्वखर्चाने मिळवून दिले

अभिप्राय द्या..