जिल्हयात प्रथमच नांदगाव ग्रा.पं. चा उपक्रम – दिग्दर्शक दिपक कदम..

आचरा /-

नांदगाव ग्रा.पं.च्या १४ वा वित्त आयोग कौशल्य प्रशिक्षण अंतर्गत नांदगावातील मुला मुलींच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी २ महिन्याचे गायन,नृत्य,अँक्टींग प्रशिक्षणाचे नुकतेच उद्घाटन मराठी नामवंत दिग्दर्शक दिपक कदम यांच्या हस्ते व मराठी चित्रपट अभिनेते राजू राणे ,चित्रपट सिरियल अभिनेता सुधीन तांबे ,पार्श्वगायीका मयुरी नेवरेकर –चिंदरकर यांच्या उपस्थीतीत करण्यात आले .यावेळी त्यांच्या सोबत नांदगाव पं.स.सदस्या सौ.हर्षदा वाळके,नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर,उपसरपंच निरज मोरये ,ग्रामविस्तार अधिकारी पी.एन.हरमळकर,ग्रा.पं.सदस्य अरूण बापार्डेकर,सदस्या सौ.वृषाली मोरजकर ,सौ.ईशा बिडये,रमिजान बटवाले,डॉ.दिशा वाळके,श्रीमती शेलार विद्यार्थी, पालक वर्ग उपस्थीत होते.

यावेळी बोलताना दिग्दर्शक दिपक कदम म्हणाले की,सिंधूदूर्ग जिल्हयात प्रथमच नांदगाव ग्रा.पं.च्या या 14 वा वित्त आयोगातून असे मुलांना विविध प्रशिक्षण देत आहे हे खरोखरच कौतूकास्पद असून यातूनच या वयामध्ये मुल घडत आहेत .असे सांगत लोकप्रतिनिधी व अधिकारी एकत्र आले अथवा दोघांच्या दिशा एक असेल तर गावाचा विकास होतो असाच प्रकार नांदगाव ला पाहवयास मिळत आहे यामुळे वेगवेगळे कौतूकास्पद उपक्रम होत असून यातूनही मुलांचा विकास होत असल्याचे मत यावेळी व्यक्त केले .तर हर्षदा वाळके यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा देत मुलांच्या ही कला गुणांचे कौतूक केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविस्तार अधिकारी पी.एन.हरमळकर ,सुत्रसंचालन ऋषिकेश मोरजकर तर आभार सरपंच आफ्रोजा नावलेकर यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page