कुडाळ तालुक्यातील साळगाव येथून बेपत्ता असलेला युवक शशिकांत धुरी हा युवक वेरणा-गोवा येथे आढळून आला आहे. तो २३ तारखे पासून बेपत्ता असल्याची नोंद कुडाळ पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या शोध मोहीमेत त्याचे लोकेशन आज गोवा येथे सापडले. त्यानुसार शशिकांत याला पोलिसानी ताब्यात घेतले आहे.आपण गोवा येथे एका कंपनीत काम करीत आहे,असे त्याचे म्हणणे आहे.या तपासासाठी कुडाळ पोलिस ठाण्याचे हवालदार मंगेश शिंगाडे व पोलीस बाळकृष्ण घाडीगावकर यांनी प्रयत्न केले.अशी माहिती कुडाळ पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे.