मालवण
मालवण तालुक्यातील कोळंब येथे बुधवारी प्लास्टिक अंडे मिळाल्याचा दावा करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान सदरचे अंडे विक्री करणाऱ्या व्यावसायिकाने आज ग्रामस्थांना समोर येवून सदरचे अंडे फोडून दाखवले असता ते खरेखुरे कोंबडीचे अंडे असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे कोळंब मधील प्लास्टिक अंडे या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान मालवण तालुका सहा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही प्लास्टिक अंडी विक्री होत नसून अशा प्रकारचा प्रयत्नही केला जात नाही. अंडी विक्री करणाऱ्या व्यवसायिकांना अडचणीत आणण्याच्या दृष्टीने ही चर्चा अनेकदा केली जाते. यामुळे ग्राहकांनी आणि नागरिकांनी घाबरून न जाता अशा खोट्या आणि चुकीच्या पद्धतीने चाललेल्या चर्चेला लक्ष देऊ नये असे आवाहन अंडी विक्रेत्यांनी केले आहे.
मालवण कोळंब येथील एका हॉटेल व्यावसायिकांच्या दुकानातून मधून खरेदी केलेल्या अर्धा डझन अंड्यापैकी एक अंड प्लास्टिक चे असल्याचे एका ग्राहकाला आढळून आले.त्यानी तातडीने अंडी खरेदी केलेले दुकान गाठून संबंधित मालकाला ही बाब निदर्शनास आणून दिली होती. यामुळे दिवसभर गावात चर्चा झाली होती.