“सिरम” ने भारतातील चाचण्या थांबवल्या

नवी दिल्ली /-

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूटकडून विकसित करण्यात येत असलेल्या कोरोना “कोव्हीशिल्ड”च्या चाचण्या थांबवण्याचा निर्णय सिरम इन्स्टिट्यूटने घेतला आहे. अशी माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे. परदेशात या लशीची चाचणी सुरू असताना एका स्वयंसेवकावर त्याचे दुष्परिणाम होऊ लागले. त्यानंतर भारतीय औषध महानियंत्रकानी यासाठी सिरमला नोटीस बजावली. त्यानंतर हे भारतातील चाचण्या थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सिरम इन्स्टिट्यूटने याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे की, आम्ही भारतातील लस चाचणीचा आढावा घेत आहोत. अ‍ॅस्ट्राजेनेका कंपनी चाचण्या सुरू करेपर्यंत भारतातील चाचण्या थांबवत असल्याचे सिरमने स्पष्ट केले आहे. आम्ही ‘डीसीजीआय’च्या सूचनांचे पालन करीत असून, त्याबाबत सध्या काही टिपणी करणार नसल्याचेही ‘सिरम’ने म्हटले आहे.

अभिप्राय द्या..