११ सप्टेंबरच्या दोन संस्मरणीय आठवणी..

विशेष

▪️अमेरिकेसाठी 11 सप्टेंबरशी जोडलेल्या दोन महत्वपूर्ण आठवणी आहेत. एक आठवण कटू असली तर एक मात्र संस्मरणीय अशीच आहे. आज आपण या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करूयात..

•१. *वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्याला 19 वर्षे पूर्ण* : अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 11 सप्टेंबर 2001 रोजी मोठा हल्ला केला गेला. याला जगातील सर्वात मोठा भीषण दहशतवादी हल्ला म्हटले जाते

● या हल्ल्यात जुळे टॉवर जमीनदोस्त झाले आज त्या घटनेला 19 वर्षे पूर्ण झाली.
● या हल्ल्यात सुमारे 70 देशातील 3000 नागरिक ठार झाले होते.
● याच दिवशी अमेरिकन लष्करी यंत्रणा पेंटागॉनवर सुद्धा एक विमान दहशतवाद्यांनी धडकविले होते.
● या ऐतिहासिक हल्ल्यात 19 दहशतवादी सामील होते. या हल्ल्याचा मास्टरमाईंड अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन होता.
● पुढे लादेनला मारण्यासाठी अमेरिकेने 2.5 कोटी डॉलर्सचे बक्षीस लावले होते.
● अखेर 2 मे 2011 रोजी ओसामा याला पाकिस्तानच्या अबोटाबाद येथे घुसून अमेरिकन सील कमांडोनी ठार केले होते.

•२. *स्वामी विवेकानंद यांचे ऐतिहासिक भाषण* : 11 सप्टेंबर 1893 रोजी घडलेली संस्मरणीय घटना म्हणजे त्या दिवशी विश्व धर्म संमेलनात भारताचे अध्यात्मिक गुरु स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या भाषणाने जगावर एक न पुसता येणारा ठसा उमटविला होता.

● आज तब्बल 127 वर्षे उलटल्यावर सुद्धा विवेकानंदांचे भाषण जनमानसावर तसेच ठसलेले आहे.
● या भाषणाची सुरुवात विवेकानंदानी ‘माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका’ अशी करून पाश्चिमात्य देशांना भारतीय संस्कृती, सहिष्णुता यांचे नवे दर्शन घडविले होते.

अमेरिकेच्या इतिहासात 11 सप्टेंबरसोबत जोडलेल्या आणखी काही घटना घडल्या आहेत. त्या म्हणजे 11 सप्टेंबर 2003 मध्ये चीनच्या विरोधाला न जुमानता तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांची भेट अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी घेतली होती. 11 सप्टेंबर 2011 रोजीच अमेरिकन लष्कराचे मुख्यालय पेंटागॉनचे बांधकाम सुरु झाले होते.

अभिप्राय द्या..