कणकवली /-
सिंधुदुर्ग जिल्हातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक प्रस्ताव प्रलंबित आहेत. बऱ्याच मुख्याध्यापकांना प्रभारी मान्यता दिलेल्या आहेत. काही मुख्याध्यापकांच्या सुनावण्या होवुन तीन महिने झाले तरि कायम मुख्याध्यापक मान्यता शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी दिलेल्या नाहीत. तीन महिण्यापेक्षा जास्त काळ कुणालाही प्रभारी मुख्याध्यापक मान्यता देवु नये . तसेच सेवाज्येष्ठता आणि रोस्टर डावलुन कायम मुख्याध्यापक म्हणुन कोणालाही मान्यता देवु नये अशी कास्ट्राईब संघटनेची भुमिका आहे. सदर बाबतीत तात्काळ सुनावणी घेवुन तीन महिन्याच्या आत कायम मुख्याध्यापक म्हणुन मान्यता द्यावी. अन्यथा कास्ट्राईब शिक्षक संघटना शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करेल असा इशारा निवेदनाद्वारे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना प्रत्यक्ष भेटुन कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप कदम आणि कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सरसिटणीस आकाश तांबे यांनी दिले .