मुणगे सुपुत्र देवदत्त पुजारे यांच्याकडून साऊंड सिस्टीम भेट!

मुणगे सुपुत्र देवदत्त पुजारे यांच्याकडून साऊंड सिस्टीम भेट!

मसुरे/-

पळसंब येथील आई जयंती रवळनाथ देवस्थान मंदिराला देवगड तालुक्यातील मुणगे येथील प्रसिद्ध भजनी बुवा आणि श्री भगवती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्थ श्री देवदत्त ऊर्फ आबा पुजारे यांनी साउंड सिस्टीम सेट भेट दिला आहे. सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविणाऱ्या पुजारे यांनी सुमारे २७ हजार रुपये किमतीचे हे साहित्य देवस्थान मानकरी यांच्या उपस्थितीत श्री देव रवळनाथ चरणी अर्पण केले.कणकवली येथील गणपत्ये काका यांनी सुद्धा सात हजार रुपये किमतीचा बॉक्स स्पीकर भेट दिला आहे. दोन्ही दात्यांचे देवस्थान व गावाच्या वतीने सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी आभार मानले आहेत.

अभिप्राय द्या..