भंडारी ऐक्यवर्धक मंडळाची स्वतःची वास्तू उभारण्यास सर्वांचे मंडळास सहकार्य लाभेल.;सभासदांची ग्वाही

भंडारी ऐक्यवर्धक मंडळाची स्वतःची वास्तू उभारण्यास सर्वांचे मंडळास सहकार्य लाभेल.;सभासदांची ग्वाही

भंडारी ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्लेची सर्वसाधारण सभा संपन्न

वेंगुर्ला /-अजय गडेकर

भंडारी ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्लेची सर्वसाधारण सभा मंडळाचे अध्यक्ष श्री रमण शंकरराव वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली साई मंगल कार्यालय येथे संपन्न झाली.यावेळी मंडळाने केलेल्या वर्षभरातील कार्याचा अहवाल सभेसमोर ठेवण्यात आला.त्यावर चर्चा झाली.ऑडिट रिपोर्ट वाचन एकही ऑडिट पॉईंट नसल्याने उपस्थित बांधवांनी समाधान व्यक्त केले.मंडळाची स्वतःची वास्तू असावी ,याबाबत सभासदानी आग्रह धरला.त्यासाठी मंडळाने त्यादृष्टीने प्रयत्न करावेत,असे सुचविण्यात आले.त्यासाठी सर्व समाजबांधव मंडळास सहकार्य करतील,अशी ग्वाही सभासदांनी मंडळास दिली.या सभेस उपाध्यक्ष ऍड.शाम गोडकर,चंद्रकांत गडेकर, सचिव विकास वैद्य,प्रा.सचिन परुळकर,प्रा.आनंद बांदेकर, जयराम वायंगणकर,रमेश नार्वेकर, बबन नार्वेकर, सुरेश बोवलेकर,राजेंद्र कांबळी,दिनेश तांडेल,सारिका काळसेकर, तृप्ती साळगावकर,गुरुदास तिरोडकर,ऍड.प्रकाश बोवलेकर, दाजी धुरी, श्रीकृष्ण पेडणेकर, गुरुनाथ कांबळी,जयप्रकाश चमणकर, प्रमोद मोबारकर,आबा खोत,दिपक कोचरेकर,मधुकर पेडणेकर, यशवंत तुळसकर,गजानन गोलतकर,आदींसह बहुसंख्य सभासद उपस्थित होते.महाराष्ट्र कोरोनाचे सर्व नियम पाळून सभा संपन्न झाली.

अभिप्राय द्या..