कुडाळ /-
स्त्री राजसत्ता प्रतिष्ठान आणि सहकारी संस्थे तर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी.स्त्री राजसत्ता प्रतिष्ठान आणि स्त्री राजसत्ता सहकारी संस्थे च्या वतीने स्त्री मुक्ती दिनाच्या औचित्याने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती सिंधुदूर्गनगरी येथे साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली.सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस संस्थेच्या अध्यक्षा जान्हवी सावंत आणि संस्थेचे सल्लागार डॉ प्रवीण सावंत यांनी पुष्पहार अर्पण केला. संस्थेच्या सर्व संचालकांनी व सदस्यांनी ओवी गायिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्त्री राजसत्ता प्रतिष्ठानच्या सरचिटणीस व सहकारी संस्थेच्या संचालक लेखा मेस्त्री यांनी केले.संस्थेची नियमावली, शिस्त आणि संस्थेची पुढील दिशा या बाबत त्यांनी मार्गदर्शन केले.स्त्री राजसत्ता सहकारी संस्थेच्या संचालक व प्रतिष्ठानच्या विश्वस्त धनश्री गवस यांनी संस्थेची ध्येय,व उद्दिष्ट त्याच बरोबर दोन्ही संस्थांच्या पुढील वाटचालीची दिशा देखील सांगितली. स्त्री राजसत्ता प्रतिष्ठानच्या सहकोषाध्यक्ष आणि सहकारी संस्थेच्या संचालक श्रेया गवंडे यांनी स्त्रियांच्या उत्पादित मालाला मार्केट मध्ये असलेली संधी आणि त्यावर करावयाच्या उपाययोजना व मिळणारी संधी याबाबत मार्गदर्शन केले.त्याचबरोबर संस्था जिल्ह्यातील स्त्रियांच्या उत्पादित मालासाठी कशापद्धतीने बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहे त्याबद्दल मार्गदर्शन केले. संस्थेच्या कोषाध्यक्षा व संचालिका पूनम चव्हाण यांनी संस्थेच्या आर्थिक नियोजनाचे धडे दिले.आणि कोणकोणत्या वस्तूसाठी आज बाजारपेठेत संधी आहे याबद्दल मार्गदर्शन केले,आपली संस्था व संस्थेकडून माझी अपेक्षा याविषयी चर्चासत्रात सर्व सभासदांनी आपले मनोगत व्यक्त केले.आपल्या आणि संस्थेच्या उत्कर्षा बाबतच्या नियोजनासंदर्भात विचार मांडले.
संस्थेच्या अध्यक्ष जान्हवी सावंत यांनी संस्थेच्या पंच:सुत्री चे विवेचन केले.येत्या काळात संस्थेच्या ब्रॅण्डनेम सहित निर्माण केलेली उत्पादने लवकरच लॉन्च केली जातील. संस्थेची उत्पादने ही अतिशय उच्च दर्जाचीच (प्रीमियम) असतील.त्याच बरोबर संस्था द्वारे मार्केटिंग केल्या जाणाऱ्या वस्तूही उच्च दर्जाच्याच असतील.संस्थेचे सभासद असणाऱ्या महिलांना रोजगाराची संधी आणि प्रतिष्ठा मिळवून देणे हेच संस्थेचे ध्येय राहील.स्त्री मुक्तीदिनाच्या निमित्ताने अगरबत्ती प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. संस्था मार्केटिंग करणार असणाऱ्या पहिल्या प्रॉडक्ट् म्हणजेच पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे तिळाचे लाडू याचे अनावरण सदस्यांच्या हस्ते करण्यात आले.आणि खऱ्या अर्थाने संस्थेच्या कामाची सुरुवात स्त्री मुक्तीदिनाच्या औचित्याने झाली.संस्थेच्या सभासद रश्मी कांदळगावकर यांनी
सावित्रीबाई फुले यांच्यावर एकपात्री सादर केले. तर संस्थेच्या सदस्या सारिका तानवडे यांनी सावित्रीबाई यांच्यावर काव्यवाचन केले.कुडाळ पंचायत समितीचे मा.सभापती राजन जाधव यांनी सावित्रीबाई फुले यांची देखणी प्रतिमा संस्थेस भेट दिली. कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम ने झाली.