कणकवलीत पहाटे झेंडा चौक येथील ३ दुकानाना आग.; शॉट सर्किटने लागली असल्याचा अंदाज

कणकवलीत पहाटे झेंडा चौक येथील ३ दुकानाना आग.; शॉट सर्किटने लागली असल्याचा अंदाज

कणकवली /-

कणकवली बाजरपेठेत पहाटे आगीचा तांडव सुरू यात कणकवली झेंडाचौक येथील जय भारत कोल्ड्रिंक्स हाऊस जळून खाक झाले, त्या शेजारील रामचंद्र बाबाजीशेठ उचले किराणा आयुर्वेदिक दुकान आगीच्या भक्षस्थानी आले तर कोल्ड्रिंक्स हाऊस शेजारील अंधारी ब्रदर्स यांच्या दुकान व राहत्या घराला ही या आगीची झळ पोहचली. यावेळी कणकवली नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबाद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न सुरू असला तरी पहाटे ५.३० वा. पर्यंत आग आटोक्यात आली नव्हती. दरम्यान, कणकवली झेंडा चौक येथील ३ दुकाने आगीच्या भक्षस्थानी सापडली आहेत. या आगीचे नेमके कारण समजले नसले तरी ही आग शॉट सर्किटने लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. पहाटे ३ वा. सुमारास जयभारत कोल्ड्रिंक्स हाऊस मधून मोठ्या प्रमाणत धुराचे व आगीचे लोट येवू लागले! या दरम्यान शेजारील राहत्या घरातील नागरिकांना याबाबत कल्पना आल्या नंतर त्यांनी तात्काळ याची माहिती दिली. तो पर्यंत आगीने रौद्ररूप धारण करण्यास सुरुवात केली होती. तसेच या आगीने जयभारत कोल्ड्रिंक्स हाऊसला गिळणकुत करतानाच ही आग उचले किराणा दुकानाच्या दिशेने सरकली. त्याचप्रमाणे अंधारी यांच्या दुकान व घराच्या दिशेने आगीचे लोट सुरू पसरले होते. त्यानंतर कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांना याबाबतची माहिती दिल्या नंतर त्यांनी तातडीने न.पं.चा अग्नी शामक बंब घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आनन्याचा प्रयत्न केला. त्याच प्रमाणे दिलीप बिटकॉनचा पाण्याचा टँकर मागवत आग फैलावु नये म्हणून प्रयत्न करण्यात आले. मात्र, आग आटोक्यात येत नव्हती. भर बाजारपेठेत हे अग्नी तांडव सुरू झाल्याने आकाशात धुराचे लोढ व आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह नगरसेवक कन्हैया पारकर, पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, भाई साटम, प्रसाद अंधारी, अमित सापळे, नाना सापळे, प्रद्युम मुंज, बापू पारकर, हर्षल अंधारी, आदित्य सापळे, आशिष वालावलकर आदी पोहचत तसेच कणकवली नगरपंचायतीचे कर्मचारी व नागरिकांनी मदत कार्य केले. अद्याप ही आग आटोक्यात येत नसून या आगीत दुकान मालक आबा उचले, राजेंद्र बाजाजी, नाथा अंधारी यांचे लाखों रुपयेचे नुकसान झाले आहे. तर आग आटोक्यात आणण्यासाठी कणकवली न.पं. बरोबर मालवण, सावंतवाडी येथील अग्निशामक बंब मागविण्यात आला होता. मात्र हे बंब येण्यास वेळ लागणार असल्याने तसेच शेजारील घरे दाटीवाटीने असल्याने जेसीबीच्या साहाय्याने नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला जात होता.

अभिप्राय द्या..