वेंगुर्ला /-
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत तालुक्याचा सर्वांगीण विकास साधा,असे आवाहन वेंगुर्ले पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी यांनी वेंगुर्ला येथे आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत केले.वेंगुर्ले साई मंगल कार्यालय येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत गाव विकास – ग्रामपंचायत विकास आराखडा उपक्रमासंदर्भात पं. स.सदस्य -तालुकास्तरीय अधिकारी यांची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली.या कार्यक्रमाचे उदघाटन सभापती अनुश्री कांबळी यांच्या हस्ते झाले.यावेळी पं. स.सदस्य सुनिल मोरजकर,स्मिता दामले,साक्षी कुबल,गौरवी मडवळ, प्रणाली बंगे,गटविकास अधिकारी उमा पाटील,कृषी अधिकारी विद्याधर सुतार,महाराष्ट्र शासन तज्ञ प्रशिक्षक दादा साईल,संतोष पाटील,पं. स.खातेप्रमुख आदी उपस्थित होते.यावेळी शासननिर्णय, निधीबाबत माहिती,विविध घ्यावयाची कामे याबाबत माहिती देण्यात आली.