तीन गावांसाठी एकच लक्ष बहुतेक होणार ग्रामपंचायत हाच आपला पक्ष.;तीन ग्रामपंचायत साठी एकूण अर्ज ६७

तीन गावांसाठी एकच लक्ष बहुतेक होणार ग्रामपंचायत हाच आपला पक्ष.;तीन ग्रामपंचायत साठी एकूण अर्ज ६७

दोडामार्ग /-

यावेळची ग्रामपंचायत निवडणुक चुरशीची होण्याची चिन्हे असून पक्षपातळीवर ग्रामपंचायत निवडणूक लढवली जात असल्यामुळे आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ६२ उमेदवारी अर्ज तीन ग्रामपंचायत निवडणुका साठी आल्याची माहिती दोडामार्ग तहसील कार्यालयातून देण्यात आली. आज ६२ व काल ०५ मिळून एकूण ६७ अर्ज या ठिकाणी दाखल झाले आहेत. यात कुडासे २७, हेवाळे १८, तर तेरवण मेढे २२ असे उमेदवारी अर्ज आले आहेत.

तालुक्यातील कुडासे, आयनोडे – हेवाळे व तेरवण मेढे ग्रुप ग्रामपंचायत या तीन ग्रामपंचायतच्या निवडणूक होणार असून फॉर्म भरण्याच्या पहिल्या दिवसापासून या ठिकाणी चुरस पाहावयास मिळत आहेत. प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते हे जरी ग्राम विकास आघाडी करून निवडणूक लढवली जाणार असल्याचे सांगत असले तरी सुद्धा पक्षीय पातळीवर ती ही निवडणूक होणार असल्याची लक्षणे दिसत आहेत. त्यानुसार गावागावात जाऊन उमेदवार शोधून त्यांना तयार करून या ठिकाणी तहसीलदार कार्यालयात तब्बल आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ६२ अर्ज दाखल झाले तर कालच्या दिवसात ०५ अर्ज भरण्यात आले होते.

ऑनलाइन प्रक्रिया काहीशी जटील असल्यामुळे या ठिकाणी अर्ज येण्यास विलंब होत होता मात्र आज ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यासाठी साडेपाचही निर्धारित वेळ असताना तब्बल ६२ इतके अर्ज एकाच दिवशी दाखल झाल्याची माहिती मिळते आहे

येत्या दोन-तीन दिवसात या निवडणुकीत रंगतदार वातावरण पहावयास मिळणार असून उद्या अर्जाची छाननी व अर्ज मागे घेण्याची तारीख ०४ जानेवारी असल्याने त्यांनतर नेमकी दिशा स्पष्ट होणार आहे.

अभिप्राय द्या..