तळेरे बाजारपेठ येथे 22 सप्टेंबर पर्यंत कंटेनमेंट झोन

तळेरे बाजारपेठ येथे 22 सप्टेंबर पर्यंत कंटेनमेंट झोन

कणकवली /-

कणकवली तालुक्यातील तळेरे ग्रामपंचायतीच्या एका सदस्याचा आणि सरपंचाच्या पतीचा कोरोना बाधित अहवाल आल्यानंतर सर्व ग्रामपंचायत कर्मचारी गृह विलगिकरण करुन ठेवण्यात आले. त्या सर्वांचे तसेच कोरोना बाधित आलेल्या संपर्कतील व्यक्तिंचे असे एकूण 31 जणांचे स्वब घेण्यात आले. तर गुरुवारी अजून दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह तर दोघांचे निगेटीव्ह आलेत. त्यामुळे कोरोना पॉझिटीव्ह संख्या पाच वर पोहोचली आहे. या पर्श्वभूमीवर व्यापारी संघटनेने सभा घेत अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
दोन पॉझिटीव्ह रिपोर्ट आल्यानंतर सर्व ग्रामपंचायत कर्मचार्यंना गृह विलगिकरणात ठेवण्यात आले. तसेच ग्रामपंचायतही पुर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. तर गुरुवारी अजून दोघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले असून आता संख्या पाचवर पोहिचली आहे. त्यातील एक ओरोस येथे तर एक देवगड येथे उपचार घेत आहे. तर एका ज्येष्ठ व्यक्तीला अधिक उपचारासाठी ओरोस येथे पाठविले असल्याची माहिती तळेरे उपकेंद्रच्या डॉ. धनश्री जाधव यांनी दिली. पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णाचे तळेरे बाजारपेठ येथील दुकान सील करण्यात आले. या सर्व पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून सर्व सर्व्हे करण्यात आला. तर बाहेर गावावरुन आलेल्या व्यक्तींचीही तपासणी करण्यात आली असून आज स्वब घेतलेले अहवाल 48 तासात येतील. त्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होईल. तळेरे येथे कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन तातडीने तळेरे आदर्श व्यापारी संघटनेने सभा घेतली. त्यावेळी विविध विषयांवर चर्चा करुन बाजारपेठ बंद न ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, या सर्व पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले.

अभिप्राय द्या..