वेंगुर्ला
सुरंगी महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित वेंगुर्ला -आसोली घाडीवाडा या संस्थेच्या फळप्रक्रिया प्रकल्पाचे उदघाटन क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती व महिला शिक्षण दिनाचे औचित्य साधून रविवार ३ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे.या कार्यक्रमाचे उदघाटन सिंधुदुर्ग जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाचे अध्यक्ष तथा वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष एम.के.गावडे यांच्या हस्ते होणार आहे.हा कार्यक्रम जि.प.सदस्य विष्णुदास उर्फ दादा कुबल यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा परब,पं. स.सदस्य सुनिल मोरजकर, माजी पं. स. सदस्य विश्वनाथ धुरी,तालुका कृषी अधिकारी हर्षा गुंड,आसोली सरपंच रिया कुडव, सोसायटी चेअरमन सदानंद गावडे,ल्युपिन फाउंडेशनचे योगेश प्रभू,सहकारी अधिकारी आर.टी. चौगुले,सिंधुदुर्ग बँक विकास अधिकारी डी. एन.प्रभूआजगावकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष सुजाता देसाई यांनी केले आहे.