वेंगुर्ला येथे १० जानेवारीला वक्तृत्व स्पर्धा

वेंगुर्ला येथे १० जानेवारीला वक्तृत्व स्पर्धा

वेंगुर्ला
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग – तुळसच्या वतीने सलग सातव्या वर्षी युवक दिनाचे औचित्य साधून रविवार १० जानेवारी २०२१ रोजी सकाळी ९.३० वाजता कोरोनाचे शासकीय नियम पाळून वेंगुर्ला येथील हॉटेल लौकिक, सभागृह येथे खुल्या गटासाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वामी विवेकानंद यांची जयंती ‘राष्ट्रीय युवक दिन’ म्हणून साजरी केली जाते.या दिनाच्या औचित्याने युवकांना व्यासपीठ व विचारमंथन करण्याच्या उद्देशाने सदर स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. सद्यस्थितीत मानवी जीवन जगताना सामाजिक, सांस्कृतिक,आरोग्य,आर्थिक आणि पर्यावरणीय अशा अनेक घटकांशी तडजोड करत जगताना नैसर्गिक व मानव निर्मित अनेक समस्यांशी संघर्ष करत जगणे कौशल्याचे आणि आव्हानात्मक झाले आहे. याच विषयावर भाष्य करण्यासाठी ‘जगणे महाग होत आहे’या विषयावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.खुल्या गटासाठी किमान ८ मि.तर कमाल १० मि.एवढा सादरीकरणाचा वेळ आहे.
स्पर्धेतील खुला गट प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे रोख रक्कम १००० रुपये, ७०० रु. व ५०० रु., उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय क्र.साठी प्रत्येकी २५० रु.आणि सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी प्रतिष्ठानचे सचिव गुरुदास तिरोडकर (९४२०७४७२६८) यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सचिन परुळकर यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..