वेंगुर्ले – निवती ग्रामस्थांच्या उपोषणाला भाजपाचा पाठींबा

वेंगुर्ले – निवती ग्रामस्थांच्या उपोषणाला भाजपाचा पाठींबा

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर यांनी उपोषण स्थळी भेट

कुडाळ-

तालुक्यातील निवती रस्त्याच्या उर्वरित कामास सुरुवात न केल्यामुळे कुडाळ येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयासमोर निवती येथील शेकडो ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले .
गेली दोन वर्षे ठेकेदाराकडुन म्हापण ते निवती या रस्त्याचे काम सुरु करुन वर्षभर काम बंद स्थीतीत आहे . वारंवार ग्रामस्थांनी मागणी करुनही ठेकेदाराकडुन सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने ग्रामस्थांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली व जोपर्यंत कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत उपोषण संपणार नाही असा इशारा कार्यकारी अभियंता यांना दिला.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी अधिक्षक अभियंत्यांशी फोन वरून चर्चा करुन ठेकेदाराकडुन लकरात लवकर सुरु करण्याबाबत सांगितले.अन्यथा सदर ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे अशी मागणी केली .
यावेळी निवती सरपंच भारती धुरी , मच्छिमार नेते अशोक सारंग , शामराव सारंग , बुथप्रमुख नागेश सारंग , मच्छिमार सोसायटी चेअरमन कमलेश मेथर , दिलीप भगत तसेच शेकडो मच्छिमार बांधव उपस्थित होते .

अभिप्राय द्या..