कोल्हापूर /-

मनुष्य हा समाजशील प्राणी असून समाजात वावरतांना त्याला अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. समाजाच्या तळागाळातील लोकांवर होणारा आत्याचार अधिकारी वर्गाची दडपशाही विविध संस्थांमध्ये होत असलेला भ्रष्टाचार आधी सर्वच गोष्टींवर जाणीवपूर्वक लक्ष ठेवून त्यांना न्याय कसा मिळवून देता येईल व संघटनेच्या मजबूत बांधणीसाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती चे राज्यस्तरीय अधिवेशन लवकरच सातारा येथे घेण्यात येणार असून पत्रकारांवर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी व त्यांना शासनाच्या मार्फत संरक्षण मिळावे हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून राज्यस्तरीय माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती आणि पोलिसमित्र समितीच्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी यांची ऑनलाईन गुगल मिट द्वारे बैठक घेण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष दीपक कांबळे यांनी दिली आहे.
यावेळी २४ जानेवारी रोजी सातारा येथील राज्य स्तरावर होणाऱ्या मेळाव्याचे नियोजना संदर्भात महत्वाची व साधक बाधक चर्चा करण्यात आली असून या बैठकीत राष्ट्रीय महासचिव मा.कमलेश शेवाळे साहेबांनी संघटनेचे उद्दिष्ट सांगितले व कामकाज कशाप्रकारे करावे ? याबद्दलचे मार्गदर्शन केले तसेच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश सारणीकर, राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कांबळे यांनी संघटनेच्या कामात पुढील काळात कोणते बदल केले जातील व आपली संघटना कशाप्रकारे वाढवावी लागेल ? संघटनेची ध्येय धोरणे कशा पद्धतीने अमलात आणता येतील? याबद्दलची सविस्तर माहिती दिली.तसेच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अमर बेंद्रे साहेब व आपल्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कांबळे यांनी भविष्यात राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यासंदर्भात माहिती दिली.
या बैठकीत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती मार्फत महाराष्ट्रामध्ये भव्यदिव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे, तसेच मेळाव्यास अधिकाधिक पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवावी, विभागीय, जिल्हा व तालुका कार्यकारिणी नियुक्त्या.व्हॉटस अप ग्रुप अनावश्यक मेसेज ग्रुप वर टाकण्यास मनाई,मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात सर्व पदाधिकारी यांच्यामध्ये चर्चा, संघटनेच्या कामकाजा संदर्भात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणून संघटनेचे मोबाईल ॲप बनवणार आहेत या ॲपचे मेळाव्या दरम्यान ओपनिंग करण्याचे आयोजन तसेच मेळावा संदर्भात अधिक माहिती येत्या दिनांक ६ किंवा ७ जानेवारी दरम्यान “पूर्व नियोजन बैठक” घेऊन संपूर्ण माहिती प्रसारित करण्यात येणार आहे.,हा संघटनेचा मेळावा होत असल्याने संघटनेतील सर्व पदाधिकारी विभागीय अधिकारी जिल्हाधिकारी यांनी मेळाव्यास संदर्भात आपल्या विभागातून किती पदाधिकारी उपस्थित राहणार आहे यासंदर्भात पूर्वसूचना द्यावयाच्या आहेत,या मिटिंग मध्ये संघटनेचे फेसबुक अकाउंट मध्ये जॉईन होण्यास विनंती केली आहे हे अधिकाधिक पदाधिकारी व सर्वसामान्य लोकांपर्यंत या फेसबुक अकाउंट पोचवण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यावी.
मेळाव्यादरम्यान सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्याचे योजले आहे आदी विषयांवर साधक-बाधक चर्चा करण्यात आली.यावेळी या गुगल मिटद्वारे घेण्यात आलेल्या बैठकीत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे
दिपक कांबळे(राष्ट्रीय अध्यक्ष), कमलेश शेवाळे(राष्ट्रीय महासचिव),महेश सारणीकर(महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष),
वजीर शेख (पोलीस मित्र समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष )
अमर बेंद्रे (महाराष्ट्र उपाध्यक्ष),पुष्कर सराफ (महाराष्ट्र उपाध्यक्ष),तुळशीराम जांभूळकर (महाराष्ट्र उपाध्यक्ष),
उमेश काशीकर (महाराष्ट्र उपाध्यक्ष),दिनेश शिंदे (महाराष्ट्र संघटक),
सुभाष भोसले (महाराष्ट्र सचिव), चांदभैय्या शेख (महाराष्ट्र समन्वयक ),रामभाऊ आवारे (उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख), सुरेश संकपाळ्, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष,प्रशांत भोसले (पश्चिम महाराष्ट्र कार्याअध्यक्ष),नितीन गुरव (पुणे जिल्हाध्यक्ष),
शेखर बडगे(अमरावती जिल्हाध्यक्ष),सौ श्वेता व्हनमाने
(पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा ),सौ सोनाली पोतदार
(पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा),सौ शिल्पा बनपुरकर
(चंद्रपूर महिला जिल्हाध्यक्षा),महेंद्रकुमार देशमुख
(पोलीस मित्र सोलापूर जिल्हाध्यक्ष),पोपटराव कोळेकर
(पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष),दिलिप जाधव(पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष),राजु कुलकर्णी(पुणे जिल्हा उपाध्यक्ष) आदींनी बैठकीत सहभाग नोंदवुन अडी अडचणी सोडविण्यासाठी अतिशय खेळीमेळीच्या व आनंदी वातावरणात ही बैठक पार पडली. तर पोलीस मित्र समितीचे प्रदेशाध्यक्ष मा वजीर शेख सर यांनी सांगितले की लवकरच पोलीस मित्र समिती ची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल. सर्व मान्यवरांनी आपली मते, विचार मांडले त्यामुळे संघटनेची माहिती मिळाली अशाप्रकारे महिन्यातून एकदा बैठक बोलावली म्हणजे संघटनेचे कार्य कसे चालले आहे व पुढील कार्य कसे करायचे आहे यांचे मार्गदर्शन होईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page