कणकवली /-
सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय,सिंधुदुर्गचा वारकरी मेळावा रविवारी कणकवली तालुक्यातील कळसुली भोगनाथ मंदिर येथे संपन्न झाला. यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून वारकरी मेळाव्यास शुभेच्छा दिल्या.आमदार वैभव नाईक व महाराष्ट्र वारकरी महामंडळ अध्यक्ष हभप रांजणे महाराज यांच्या हस्ते हभप हरिश्चंद्र महाराज फोंडके व हभप बाळकृष्ण महाराज जाधव यांना मानाचा संतसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.तसेच आ.वैभव नाईक व शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते वारकरी दिनदर्शिका २०२१ चे प्रकाशन करण्यात आले.
हा वारकरी मेळावा महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.कृष्णाजी महाराज रांजणे यांच्या अध्यक्षतेखाली व सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह.भ.प.विश्वनाथ महाराज गवंडळकर,महामंडळाचे कार्याध्यक्ष ह.भ.प.रेवजी महाराज वळंजू,कोषाध्यक्ष ह.भ.प.प्रभाकर महाराज फुलसुंदर,ह.भ.प.जालिंदर महाराज पाटील,ह.भ.प.भगवान महाराज कोकरे,जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला . जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत,अतुल रावराणे ,सचिव राजू राणे, हरिश्चंद्र पारधीये,मधुकर प्रभुगावकार, आबा सावंत,गुरुवर्य ह.भ.प.विनोद पाटील,रामचंद्र कदम आदी उपस्थित होते. मेळाव्यास मोठ्या संख्येने सिंधुदुर्गातील वारकरी उपस्थित होते.