दोडामार्ग राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी प्रदीप चांदेलकर यांची निवड..

दोडामार्ग राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी प्रदीप चांदेलकर यांची निवड..

दोडामार्ग /-

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव उर्फ बाबी बोर्डेकर यांचे अकाली निधन झाल्यामुळे दोडामार्ग तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्षपद रिक्त झाले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष वाढीसाठी तसेच सध्या होऊ घातलेल्या कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दोडामार्ग शहरातील माजी सरपंच तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदीप चांदेलकर यांची निवड प्रभारी तालुकाध्यक्षपदी करण्यात आली. त्या आशयाचे नियुक्तीपत्र आज जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी श्री प्रदीप चांदेलकर यांना दिले. पक्षवाढीसाठी आपण कायमच सक्रिय राहू व दोडामार्ग तालुक्यातील राष्ट्रवादी पक्ष ज्येष्ठ नेत्यांच्या सहकार्य घेऊन बळकट करणार असल्याचे याप्रसंगी नूतन तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेशभाई दळवी, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक उपाध्यक्ष गोविंद घोगळे, दिपक जाधव, संदेश वरक, उपाध्यक्ष संदीप गवस, शहराध्यक्ष सुदेश तूळसकर, ओबीसी तालुकाध्यक्ष उल्हास नाईक आदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिप्राय द्या..