राज्याच्या आरोग्य संचालक अर्चना पाटील, डॉ सतीश पवार, डॉ. श्रीमंत चव्हाण यांसमवेत बैठक संपन्न..
सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,कुडाळ येथील जिल्हा महिला बाल रुग्णालय कार्यान्वित करणे, जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था याबाबत पालकमंत्री ना. उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांनी राज्याच्या आरोग्य संचालक अर्चना पाटील, राष्ट्रीय आरोग्य अभियानचे अतिरिक्त संचालक डॉ सतीश पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांसमवेत कुडाळ येथे आढावा बैठक घेतली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यवाहीबाबत तसेच महिला बाल रुग्णालय लवकरात लवकर सुरु करण्यासाठी पदभरती करण्यासंदर्भात व रुग्णालयाचे उर्वरित काम पूर्ण करण्याबाबत ना. उदय सामंत, आ. वैभव नाईक यांनी यावेळी आवश्यक सूचना केल्या.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे उपस्थित होते.याप्रसंगी जिल्हयाच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. कोरोना रुग्णांचा इतर रुग्णांचा आढावा घेण्यात आला.तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत चर्चा करण्यात आली. एन. आर. एच. एम.च्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत व त्यांच्या इतर प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी चर्चा करण्यात आली.