… एअर होस्टेसवर बलात्कार..एक हादरवणारी घटना

… एअर होस्टेसवर बलात्कार..एक हादरवणारी घटना

पुणे : पुण्यात २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्कार झालेली पीडित तरुणी इंडिगो एअर लाईन्समधील एअर होस्टेस असल्याची माहिती मिळत आहे. वाकड पोलीस ठाण्यात बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते.

आरोपीची आणि पीडित तरुणीची टिंडर वरून ओळख झाल्याची माहिती समोर आली आहे. टिंडर हे ऑनलाइन डेटिंग ऍप असून तरूणाईत या ऍपला सर्वाधिक पसंती आहे. तरुणीवर अत्याचार करून तिला जबर मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये पीडित तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला ससून रुग्णालयात दाखल केलं आहे. तिच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

अभिप्राय द्या..