सावंतवाडी/-

सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई – महाराष्ट्र संस्थेच्या सावंतवाडी शाखेच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी महेंद्र सावंत तर सचिवपदी टिळाजी जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ तालुका शाखा सावंतवाडीच्या कार्यकारिणीचा कालावधी संपल्याने कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सन 2020 ते 2023 या कालावधीकरिता सदर निवड करण्यात आली.

सदर निवड संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष व्ही. ए. कदम यांच्या निरीक्षणाखाली संपन्न झाली. निवड झालेली पूर्ण कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष महेंद्र सहदेव सावंत, उपाध्यक्ष शिवाजी साबाजी जाधव, सचिव तिळाजी परशुराम जाधव, सहसचिव चंद्रशेखर मोहन जाधव, खजिनदार विनायक वसंत जाधव, सल्लागार नारायण लक्ष्मण आरोंदेकर, सदस्या सौ. विशाखा विनोद जाधव, सदस्य लाडू गोपाळ जाधव, दशरथ महादेव शेर्लेकर, अमित शशिकांत जाधव, संजोग भगवान जाधव, प्रकाश नागेश जाधव, वासुदेव चंद्रकांत जाधव यांची निवड करण्यात आली. यावेळी नूतन कार्यकारिणीला संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष आयु. व्ही. ए. कदम यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे सल्लागार नारायण आरोंदेकर यांनी आतापर्यंत संस्थेच्या केलेल्या कार्याविषयी माहिती दिली. समाजातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी करावा लागलेला संघर्ष, होतकरू तरुणांसाठी केलेले मार्गदर्शन आणि मदत, संस्था व्यवस्थित चालावी निभावलेल्या नेतृत्वाचे भूमिका याविषयी माहिती सांगितली. तसेच यावेळी लाडू जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे सहसचिव चंद्रशेखर जाधव यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करून विशेष सभेची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page