मसुरे
सिंधुदुर्ग जिल्हा शुटिंगबॉल असोसिएशन, सिंधुदुर्ग जिल्हा डायरेक्ट शुटिंगबॉल अससोसिएशन आणि जिल्हा शुटिंगबॉल विकास कमिटी आयोजित व कॉ. ए. बी. वर्धन स्मरणार्थ, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन पुरस्कृत जिल्हा शुटिंगबॉल अजिंक्यपद निवडचाचणी स्पर्धेत आजगाव (अ) संघाने तरळे (अ) संघाचा १६-१० अशा गुणाने पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. सावंतवाडी येथील आर. पी. डी. हायस्कुलच्या मैदानावर सिंधुदुर्ग जिल्हा सुपुत्र आणि आंतरराष्ट्रीय शुटिंगबॉल खेळाडू मोहन पेडणेकर यांच्या निरीक्षणाखाली हि स्पर्धा पार पडली.
स्पर्धेचे उदघाटन कॉ. पी.सी. नेरुरकर, अध्यक्ष, महाराष्ट्र सेल पेन्शनर, श्री रानडे यांच्या हस्ते झाले. उदघाटन प्रसंगी व्यासपीठावर कॉ. पी.सी. नेरुरकर, श्री रानडे साहेब, आंतरराष्ट्रीय शुटिंगबॉल खेळाडू – मोहन पेडणेकर, राष्ट्रीय पंच – देविदास कोलगावकर, शुटिंगबॉल अससोसिएशनचे अध्यक्ष राजा देसाई, सचिव – प्रमोद मोहिते, डायरेक्ट शुटिंगबॉल असोसिएशन चे सचिव सुरेंद्र सपकाळ, जेष्ठ खेळाडू एकनाथ केसरकर , दिनेश पवार, बाबला कुडाळकर, भाऊ मिशाळ इ. मान्यवर उपस्थित होते.
साखळी पद्धतीने खेळवलेल्या स्पर्धेत जिल्ह्यातील २१ संघ सहभागी झाले होते.
या स्पर्धेत योगेश गावडे, संदेश हळदणकर, शैलेश सुर्वे, आनंद सावंत, बाबा आंबर्डेकर, सलीम, दिलीप गावडे, स्वप्नील पांढरे, निलेश गावकर, रिकी नेमणे, ऋत्विक नेमणे इ. खेळाडूंनी नेत्रदीपक खेळ करून आपले संघ बाद फेरीत नेण्याचा मोलाचा वाट उचलला. तरळे (अ), सातेरी बाव, नांदगाव (अ), आजगाव (अ), माणगांव, आजगाव (ब), वेताळबांबर्डे (अ) आणि मातोंड या संघानी उप-उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत झालेल्या सामन्यात तरळे (अ) संघाने मातोंड संघाला आणि आजगाव (अ) संघाने आजगाव (ब) संघाला पराजित करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामना अतिशय अटीतटीचा आणि चुरशीचा होऊन आजगाव (अ) संघाने तरळे (अ) संघाचा १६-१० अशा गुणाने पराभव करत सिंधुदुर्ग जिल्हा चाचणी अजिंक्यपद पटकाविले.
स्पर्धेत विजेत्या संघाना अनुक्रमे खालील प्रमाणे रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
प्रथम क्रमांक – आजगाव (अ) ५ हजार रुपये,द्वितीय क्रमांक – तरळे (अ) ४ हजार रुपये
तृतीय क्रमांक आजगाव (ब) ३ हजार रुपये,
चतुर्थ क्रमांक – मातोंड २ हजार रुपये,पाचवा क्रमांक – माणगांव,
सहावा क्रमांक – सातेरी बाव,
सातवा क्रमांक – वेताळ बांबर्डे,
आठवा क्रमांक – नांदगाव याना प्रत्येकी 1 हजार रुपयांचे पारितोषिके देण्यात आले.
यावेळी माजी शुटिंगबॉल खेळाडू आणि वेंगुर्ला नगरपालिका विद्यमान नगराध्यक्ष दिलीप गिरप,श्री गवस – माजी उपाअधीक्षक पोलीस खाते व पासिंग व्हॉलीबॉल खेळाडू, राजन आंगणे – उद्योजक सावंतवाडी, सावंतवाडी पोलीस इन्स्पेक्टर यांनी शुभेच्छा दिल्या.
सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्री दिनेश पवार , श्री. राजा देसाई, अध्यक्ष शुटिंगबॉल असोसिएशन सिंधुदुर्ग, प्रमोद मोहिते, सचिव शुटिंगबॉल अससोसिएशन सिंधुदुर्ग, सुरेंद्र सपकाळ सचिव डायरेक्ट शुटिंगबॉल असोसिएशन सिंधुदुर्ग, जेष्ठ शुटिंगबॉल खेळाडू व खेळाडू एकत्रीकरण समिती सदस्य एकनाथ केसरकर, बबल कुडाळकर, किरण शिंदे, योगेश गावडे आणि वीज मंडळ युनियन चे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतलेत. स्पर्धेत पंच म्हणून सुरेश पाटील, देविदास कोलगावकर, दिनेश पवार यांनी काम पहिले. गुणलेखक म्हणून श्रीकांत जो ईल, संजय कुडाळकर, राजन सावंत आणि रेषा पंच म्हणून विलास कुबल, विकास बागायतकर इ. काम पहिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन्ही शुटिंगबॉल अससोसिएशन एकत्र येऊन शुटिंगबॉल खेळ पुनर्जीवित करण्यासाठी केलेला हा प्रयत्न यशस्वी झाला असून या नंतर होणाऱ्या सर्व स्पर्धाना यापेक्षा ज्यास्त संघ उपस्थित राहतील. या अससोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केवळ पदाचा विचार न करता शुटिंगबॉल खेळाच्या प्रचार आणि प्रसाराचा विचार करून एकत्रितपणे काम करण्याचा घेतलेला निर्णय गौरवास्पद आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे हे उदाहरण महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील असोसिएशन ने घेऊन आपला खेळ पूर्वी पेक्षा चांगल्या पद्धतीने खेळला जाण्यासाठी प्रयत्न करावा, असे उपस्थित मान्यवरांनी सूचित केले.