सिंधुदुर्गनगरी /-
विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बेलदार भटका समाज संघाच्यावतीने आज ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन छेडण्यात आले.या आंदोलनाला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन बेलदार भटका समाजबांधवांच्या मागण्या जाणून घेतल्या. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून व आपण स्वतः शासनाकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे आ.वैभव नाईक यांनी सांगितले.
कोरोना महामारी चे संकट संपूर्ण राज्यावर ओढवले आहे.या महामारीच्या विळख्यात बेलदार भटका समाज सापडला आहे.त्यांच्या काही मागण्याबाबत जिल्ह्यातील बेलदार भटका समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.त्यांनी केलेल्या मागण्यांमध्ये मार्च ते जुलै या पाच महिन्याचे चे 300 युनिट पर्यंतचे घरगुती वापराचे विजबिल माफ करावे .आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत रस्त्यावर काम करणाऱ्या प्रत्येक कामगारांना दहा हजार रुपये देण्याची योजना राबवून त्याचा लाभ भटक्या जाती जमातीच्या लोकांना देण्यात यावा.जिल्हा पुरवठा विभागाकडून प्रत्येक वस्तूचे भाव घोषित करण्यात आलेले आहेत तरी आकारणी केली जात आहे का याबाबत खातरजमा करुन होत असलेल्या भ्रष्टाचारास आळा घालावा.कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर झाल्याने गोरगरिबांचे रोजगार बुडाले आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे अशा लोकांना जोड धंद्याच्या निर्मितीकरिता वसंतराव नाईक महामंडळ ,खादी ग्रामोद्योग महामंडळ यांच्याकडून अर्थसहाय्य देऊन या समाजाची विस्कळीत झालेली आर्थिक घडी रुळावर आणावी यासह विविध मागण्या निवेदनातून त्यांनी मांडल्या आहेत.
मागण्यांचे निवेदन बेलदार भटका समाज संघाच्यावतीने आमदार वैभव नाईक यांना सादर करण्यात आले.याबाबत पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून व आपण स्वतः शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी आ.वैभव नाईक यांनी सांगितले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष मधुकर जाधव आणि संघाचे पदाधिकारी रावसाहेब पवार, गणेश जाधव ,किरण चव्हाण ,नितेश पवार ,शिवाजी पवार ,अजय जाधव, सागर पवार ,बाळकृष्ण जाधव ,मनोज जाधव ,संतोष पवार ,आदी उपस्थित होते.