सावंतवाडी /-
सिंधुदुर्ग काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री चंद्रकांत गावडे सावंतवाडी तालुका अध्यक्ष श्री महेन्द्र सांगेलकर यांच्या नेतृत्वाखाली कंलंबिस्त पंचक्रोशीतील जेष्ठ समाजसेवक तसेच निर्विवाद पंधरा वर्षे ग्रामपंचायत सदस्य, प्रशासकिय योजनांचे अभ्यासु जाणकार श्री अशोक वासुदेव राऊळ यांचा काँग्रेस प्रवेश केला आहे.याप्रसंगी जेष्ठ काँग्रेसचे नेते तसेच सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर यांच्या स्वागताने श्री अशोक राऊळ यांचा पक्षप्रवेश झाला.येत्या काही दिवसात श्री अशोक राऊळ यांचे सर्व कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश घेतला जाईल असे संबोधन श्री राऊळ यांनी व्यक्त केले या प्रसंगी सांगेली जि.प. मतदार संघाचे विभागीय अध्यक्ष अँड गुरूनाथ आईर उपस्थित होते.