कुडाळ /-
संपूर्ण राज्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे. अशावेळी सामाजिक कार्यासाठी एक पाऊल पुढे येऊन ॐ शिवकृपा कला क्रीडा मंडळ नेरुर आयोजित इंगेट्राऊट नाईक विद्याप्रतिष्ठान यांच्या सहकार्याने व गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट भुलेश्वर मुंबई यांच्या सौजन्याने शनिवार दि. 19 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत “भव्य रक्तदान शिबीर” करण्यात आले होते.
या शिबीरामध्ये गांवातील तसेच गांवाबाहेरील एकूण 51 रक्तदात्यांनी सहभाग घेऊन या सामाजिक कार्यात उत्साहाने मोठा हातभार लावला. या शिबीराला माजी जि. प. उपाध्यक्ष व नेरुर जि. प. सदस्य मान. श्री. रणजीत देसाई, पं. स. सदस्य श्री. संदेश नाईक, माजी जि. प. अध्यक्ष श्री. विकास कुडाळकर या मान्यवरांनी खास भेटी दिल्या. खासदार श्री. विनायक राऊतसाहेब व आमदार श्री. वैभवजी नाईक यांनी खास या शिबीरासाठी फोनवरुन शुभेच्छा दिल्या.
या शिबीरासाठी खूप मोठ सहकार्य केलं ती ग्रामपंचायत देऊळवाडा नेरुर तसेच जिल्हा रक्तपेढी सिंधुदुर्ग, प्राथमिक आरोग्य केंद्र वालावल व आरोग्य उपकेंद्र नेरूर यांनी बहुमोल सहकार्य केले. या शिबीराचा उद् घाटन सोहळा नेरुर गांवचे सरपंच मान. शेखर गावडे, उपसरपंच श्री. समद मुजावर, पंचायत समिती सदस्या सौ. प्राजक्ता प्रभू, रक्तपेढीचे वैद्यकीय आधिकारी डाॕ. राजेश पालव, डाॕ. देसाई, मंडळाचे अध्यक्ष श्री. दिलीप भांडारकर, उपाध्यक्ष श्री. आपा नेरुरकर व सचिव श्री. प्रभात वालावलकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या शिबीरासाठी ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्या सर्वांचे व ज्यांनी हे शिबीर यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी मंडळाला सहकार्य केले त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. तसेच हे शिबीर यशस्वी होण्यासाठी मंडळाचे आधारस्तंभ प्रकाश नेरुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंजुनाथ फडके, प्रफुल्ल पोईपकर, हरिश्चंद्र राऊळ, निलेश घाडी, किर्तेश भोगटे, सिध्देश नेरुरकर, अथर्व नेरुरकर, सुशांत नेरुरकर व प्रविण गुरव यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच मंगेश वालावलकर, संजय गुरव, बाबी साऊळ, निलेश गुरव, शिवाजी नेरुरकर यांनीही मोलाचे सहकार्य केले.