सिंधुदुर्गनगरी /-
एकरी धान उत्पादकतेचे प्रमाणपत्र जिल्हा मार्केटिंग अधिकारी याना देणे आवश्यक आहे जेणेकरून शेतक-यांकडील भात खरेदी मधील अडचण दुर होईल तरी सदरचे प्रमाणपत्र मार्केटिंग अधिकारी यांना देण्यात यावे अशी विनंती जिल्हा बँकेचे अध्यश,जि.प.चे माजी गटनेते सतिश सावंत यानी कृषी अधिकारी, कृषी विभाग सिंधुदुर्ग यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. जिल्ह्यात धान उत्पादकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.खरिप हंगाम २०२०-२१मध्ये हे प्रमाण ४०ते ५० क्विंटल असुन शासन पोर्टलवर हे प्रमाण कमी असल्याने (एकरी ८ते९क्विंटल)शेतक-यांना त्यांच्याकडील भात विक्री करण्यास मोठी अडचण निर्माण गोत आहे.तरी या बाबत योग्य शहनिशा करण्यात यावी अशीही विनंती श्री सावंत यांनी पत्राद्वारे केली आहे.