कणकवली /-

कणकवली तालुक्‍यात कोरोना रुग्ण वाढत असून गेल्या आठ दिवसात प्राथमिकचे पाच शिक्षक पॉझिटिव्ह आले असून 70 रूग्ण सक्रीय आहेत. त्यामुळे जोपर्यंत शासन प्राथमिक शाळा सुरू करत नाही तोपर्यंत शाळेत मुले पाठवणार नाहीत. शिक्षकांची आरटीपियार चाचणी झाली पाहिजे, असे येथील पंचायत समितीचे सभापती दिलीप तळेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.पंचायत समितीच्या दालनात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेला उपसभापती दिव्या पेडणेकर, गटविकास अधिकारी अनिल चव्हाण, गटशिक्षण अधिकारी संदेश किंजवडेकर, सदस्य मिलिंद मिस्त्री, हेमंत परूळेकर आदी उपस्थित होते. यावेळी तळेकर म्हणाले, कोरोना वाढतोय त्यातच प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षकांना 50 टक्केची उपस्थिती सक्तीची केली असून मुलांच्या पालकांशी संवाद साधण्यासाठी गृहभेटी द्याव्यात अशाही सूचना केल्या आहेत.शिक्षक जर विद्यार्थ्यांपर्यंत किंवा त्यांच्या पालकांपर्यंत पोहचत असतील तर त्यांची कोरोना चाचणी झाली पाहिजे अशी आपली मागणी आहे.

शासनाने नववी ते बारावी पर्यंत शाळा सुरू केल्या, तेव्हा माध्यमिक शिक्षकांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. त्यानंतर प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्या.तसा प्राथमिकबाबत शासनाने कोणताही निर्णय केलेला नाही.जोपर्यंत शासन काळात सुरू करण्याचा निर्णय जाहीर करत नाही. तोपर्यंत मुलांना शाळेत पाठविणे धोकादायक आहे. सध्या परिस्थिती फारच बिकट आहे. त्यामुळे तालुक्‍यातील शालेय विद्यार्थी शाळांमध्ये येणार नाहीत.शिक्षकांनीही त्यांच्या घरी जाण्यापूर्वी कोरोना चाचणी करूनच गेले पाहिजे.”तालुक्‍यामध्ये 70 रूग्ण अजूनही सक्रिय आहेत. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आला असे म्हणता येणार नाही. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळामध्ये ‘शिक्षक आपल्या दारी’ हा उपक्रम कणकवली पंचायत समितीने 23 जूनला सुरू केला होता. त्यानंतर 7 ऑक्‍टोबरला विद्यार्थ्यांची मूल्यमापन चाचणी घेतली. सध्या ऑफलाइन आणि ऑनलाईन ही शिक्षण सुरू होते; मात्र शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे आता भिती वाढली आहे.’दिलीप तळेकर, सभापती, पंचायत समिती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page