आज “पेन्शनर्स डे” निमित्ताने ‘स्त्री राजसत्ता प्रतिष्ठान’ आणि ‘कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशन’ च्या पदाधिकाऱ्यांबरोबर ‘पेन्शनर्स आणि त्यांच्या समस्या व जेष्ठांशी हितगुज’ असा संवाद-चर्चा कार्यक्रम झाला. सर्वात प्रथम उपस्थित जेष्ठांचे स्त्री राजसत्ताच्या विश्वस्त प्रतीक्षा साटम यांनी पुष्प देऊन स्वागत केले व सर्व ज्येष्ठांना शुभेच्छा देण्यात आल्या.
पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.श्री.महेंद्र नाटेकर सर यांनी सांगितले की, १७/१२/१९८२ रोजी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश मा.न्यायमूर्ती श्री.चंद्रचूड यांच्या निर्णयामुळे पेन्शनर्स च्या हक्कांकडे व प्रश्नाकडे लक्ष वेधले गेले. बऱ्याच मागण्या ह्या तिथून पुढे सुटण्यास मदत झाली.आणि म्हणून तो दिवस पेन्शनर्स डे म्हणून साजरा करण्यात आला.आज जिल्ह्यातील पेन्शनर्स च्या हक्काचे आणि एक भव्य स्वप्न असलेले ‘विकास भवन’ संस्थेने सर्वांच्या मदतीने बांधलेआहे.अजूनही बरेच काम बाकी आहे.सर्वांची मदत हवी आहे, त्यातून ग्रंथालय व शासकीय नोकरी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभं करायचे आहे.आणि इतरही सुविधा ह्या भवन मध्ये करण्याचा प्रयत्न आहे. आणि त्याच बरोबर इतर समस्यांबाबत माहिती दिली.

ज्येष्ठ नागरी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष श्री.दादा कुडतरकर यांनी, जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या १६% एवढी जेष्ठ मंडळी आहेत.त्यांच्या प्रश्नांना प्राधान्यक्रम मिळायला हवा.स्त्री राजसत्ता प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ.जान्हवी सावंत यांनी ‘स्त्री राजसत्ता प्रतिष्ठान’ चे सर्व विश्वस्त व सभासद हे जेष्ठ आणि पेन्शनर्स च्या प्रश्नांना सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. जे शक्य होईल ती फुल न फुलाची पाकळी मदत करणार आणि शासन स्तरावरही काही विषय सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार अशी ग्वाही दिली. पेन्शनर्स असोसिएयशन आणि जेष्ठांच्या संस्थां सोबत स्त्री राजसत्ता प्रतिष्ठान संयुक्त उपक्रम भविष्यात राबवेल. आज अगदी अमेरिका व इतर देश आणि आपल्या भारतात केंद्र राज्य पातळीवर सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर आपल्या विकासाच्या प्रश्नांवर सक्रिय आहेत. आपणही तशाच प्रकारे सक्रिय राहून आपल्या अनुभवाचा फायदा हा गाव, जिल्हा ते राज्य आणि देशाच्या विकासाठी देत राहावा. आपला आशीर्वाद आणि मार्गदर्शन हे सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्यांच्या मागे सतत राहावे ही इच्छा या पेन्शनर्स डे च्या निमित्ताने व्यक्त करण्यात आली.

स्त्री राजसत्ता प्रतिष्ठान च्या सरचिटणीस सौ.लेखा मेस्त्री यांनी संस्थेची प्रतिनिधी म्हणून सर्व समस्यांच्या सोडवणुकीसाठी व पाठपुराव्यासाठी मी सदैव तत्पर राहीन असा शब्द देते असे सांगितले.सौ.सारिका तानावडे यांनी या निमित्ताने काव्य वाचन केले.आज श्री.पि.बी.पाटील,श्री.बी.आर.चव्हाण, श्री.विद्याधर जोशी, श्री.अनंत कदम, श्री.विश्वनाथ केरकर, श्री.अरुण गणपत्ये, स्त्री राजसत्ता प्रतिष्ठान च्या विश्वस्त सौ.प्रतीक्षा साटम आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page