वॉटरस्पोर्ट्स प्रश्न निकाली काढा.! खा.राणे यांची मेरीटाईम सीओ व राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा..

वॉटरस्पोर्ट्स प्रश्न निकाली काढा.! खा.राणे यांची मेरीटाईम सीओ व राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा..

 

मालवण /-

मालवणसह कोकण किनारपट्टीवर पर्यटकांची सर्वाधिक पसंती असलेले वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्यास बंदर विभाग (मेरीटाईम) परवानगी देत नसल्याप्रश्नी माजी मुख्यमंत्री खास. नारायण राणे यांनी मेरीटाईम बोर्ड मुंबई सीओ अमित सैनी व राज्याचे प्रधान सचिव संजय कुमार यांच्याशी चर्चा केली.

कोरोना पार्श्वभूमीवर वॉटर स्पोर्ट्स सुरु करण्याबाबत आवश्यक असलेली नियमावली (एसओपी) लवकरात लवकर मंजूर करून वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्यास परवानगी द्या. अशी मागणी वजा सूचना राणे यांनी केली आहे. याला अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या खासदार नारायण राणे यांच्याकडे वॉटर स्पोर्ट्स समस्या व्यवसाईकांच्या वतीने मांडण्यात आल्या. बंदर विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे पर्यटनावर परिणाम होत असल्याबाबतहीही लक्ष वेधण्यात आले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, संध्या तेरसे, रणजित देसाई, राजू राऊळ, सुनील बांदेकर, भाई मांजरेकर व अन्य उपस्थित होते.

राणे यांनी सुरवातीला मेरीटाईम बोर्ड सीओ अमित सैनी यांच्याशी दूरध्वनी वरून चर्चा केली. कारवाई कोणत्या कारणासाठी केली जात आहे याबाबत माहिती घेतली असता कोरोना खबरदारी नियमावली अद्याप मंजूर झाली नसल्याची माहिती समोर आली. त्यांनंतर राणे यांनी प्रधान सचिव सजीव कुमार यांच्याशी संपर्क साधून एसओपी लवकरात लवकर मंजूर करण्याबाबत चर्चा केली. एकूणच वॉटर स्पोर्ट्स व्यवसाईकांच्या अन्य समस्याही सोडवण्याबाबत राणे यांनी मेरीटाईम सीओ यांच्याशी चर्चा केली आहे.

अभिप्राय द्या..