सोलापूरमधून मुंबईला येणारे तीन कोटी रुपयांचे सोने जप्त, चालकाच्या सीटमुळे संपूर्ण प्रकार उघडकीस

सोलापूरमधून मुंबईला येणारे तीन कोटी रुपयांचे सोने जप्त, चालकाच्या सीटमुळे संपूर्ण प्रकार उघडकीस

विशाखापट्टनमवरून मुंबईला जाणारे तीन कोटी रुपये किमतीचे तस्करी होत असलेले सहा किलो सोने पोलिसांनी जप्त केले आहे.

सोलापूर : सोलापूरमध्ये सोनं जप्तीची मोठी घटना समोर आली आहे. तीन कोटी रुपयांचे सहा किलो सोने ग्रामीण पोलिसांनी जप्त केले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशाखापट्टनमवरून मुंबईला जाणारे तीन कोटी रुपये किमतीचे तस्करी होत असलेले सहा किलो सोने पोलिसांनी जप्त केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कारमधून एक किलो वजनाची सहा सोन्याची बिस्कीट नेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनतर यावर कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर-पुणे महामार्गावरील सावळेश्वर टोल नाक्याजवळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे चालकाच्या सीटखाली लॉकरमध्ये सोने लपवून ठेवले होते.

सोने तस्करीची माहिती पोलिसांना मिळताच सापळा रचून पोलिसांनी वाहनावर कारवाई केली. यामध्ये तब्बल सहा किलो सोने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमध्ये कार चालकासह दोघांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली असून पुढील चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

या घटनेमुळे खरंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हे सोनं नेमकं कुठून आणि कुठे नेलं जात होतं. यामध्ये आणखी कोणत्या टोळ्या आहेत? याचाही पोलीस आता शोध घेत आहे. तर या सगळ्यासाठी पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यातूनही गाडीचा शोध घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

अभिप्राय द्या..