कागदोपत्री विकासा वर आपली पाठ थोपटून घेण्यात कुडाळ पंचायत समितीचा भर
प्रशासनात कागदी घोडे नाचविण्यात माहीर असणाऱ्या, गटविकास अधिकारी कुडाळ यांनी ओडीएफ प्लस चे सर्वेक्षणचे गावातील संगणक परिचारक(डाटा ऑपरेटर) यांच्या माथी मारून मानधन नसल्याने आधीच हैराण असणाऱ्या संगणक परिचारकांनी या कामाला विरोध दर्शविला आहे.
ग्रामपंचायत मार्फत पूर्ण वर्षभराचे आगाऊ पैसे घेऊन शासनाने एका खाजगी कंपनीला टाटा ऑपरेटर भरती चे ठेके महाराष्ट्रभर दिले. त्यानुसार ग्रामपंचायतींनी रूपये १२०००/ महिना, त्यातले डाटा ऑपरेटर यांना मात्र ६०००रूपयेच मासिक पगार वरचे पैसे का व कोणाच्या घशात हा संशोधनाचा विषय आहेच. परंतु या गावातील डाटा ऑपरेटर मुलांना तो तुटपुंजा पगारही कोरोना काळात जीवाची पर्वा न करता काम करूनही अजून पर्यंत धड मिळालेला सुद्धा नाही . तरीही त्यांच्या माथी प्रशासनाचा धाक दाखवून हे अधिकारी अशा आडमुठ्या पद्धतीने काम करावयास लावत असतील तर मनसे याप्रश्नी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन या आमच्या गावातील युवक युवतींच्या समस्या मांणार आहोत.तरी सरपंच संघटनेने सुद्धा आपल्या गावचा पैसा अशाप्रकारे फुकट जात असेल तर त्याबाबत येणाऱ्या ग्रामसभेमध्ये मांडून त्याला विरोध करणे गरजेचे आहे.
त्याचप्रमाणे आमच्या गटविकास अधिकारी साहेबांनी आपल्या पंचायत समिती मार्फत एका दिवसात हजारच्या वर बंधारे बांधले असे कागदोपत्री जाहीर केले त्याचीही माहिती घेऊन महाराष्ट्र सैनिक प्रत्यक्षात बिडिओ साहेबांना सोबत घेऊन जाग्यावर जाऊन पाहणी करण्याचेही काम करणार आहे.तसेच यापुढील काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच निधीला मोठ्या प्रमाणात शासनाकडून कात्री लावल्यामुळे जो काही तुटपुंजा निधी सिंधुदुर्गच्या विकासाला येईल त्याचा योग्य विनियोग होऊन सामान्य जनतेला जास्तीत जास्त फायदा कसा होईल यावरही महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग आगामी काळात लक्ष ठेवेल.असे मनसे चे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किंनळेकर यांनी मीडिया शी बोलताना सांगितले आहे.