मालवण /
मालवण मालवण कोळंब येथील एका हॉटेल व्यावसायिकांच्या दुकानातून मधून खरेदी केलेल्या अर्धा डझन अंड्यापैकी एक अंड प्लास्टिक चे असल्याचे ग्राहक संजय मुणगेकर यांना आढळून आले.त्यानी तातडीने अंडी खरेदी केलेले दुकान गाठून संबंधित मालकाला ही बाब निदर्शनास आणून दिली.दरम्यान, बाजारात आता बनावट अंडी विक्रीला आली आहेत तेव्हा अंडी खवय्यानो अंडी खाताना सावधान असा इशारा देणं वावग ठरणार नाही. मालवण कोळंब येथील दूध विक्रेता श्री संजय मुणगेकर यांनी आज कोळंब येथील एका हॉटेल व्यावसायिकाच्या दुकानातून अंडी खरेदी केली. घरी जाऊन अंडी पहिली असता त्यातील एक अंड कडक, प्लास्टिक चे आवरण असल्याचे त्यांना दिसून आले. तर अंड फोडण्यासाठी प्रयत्न केला असता अंड फुटत ही नव्हतं त्यामुळे ज्या दुकानातून अंडी खरेदी केली त्या दुकानाचे मला श्री केळुसकर यांच्या निदर्शनास जी बाब आणून दिली. यावेळी दुकान मालक यांनी आपण ज्या एजंट जवळून अंडी खरेदी करतो त्यांना याबाबत माहिती देऊ असे सांगितले.दरम्यान, बाजारात बनावट अंडी विक्री होत आहेत ही चर्चा व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. मात्र आता प्रत्येक्षात बनावट अंडी विकली जात असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे अंडी खवय्यानो अंडी खरेदी करताना व खातांना सावधान व्हा अस म्हणायची वेळ आली आहे.