कोल्हापूर /-
कसबा वाळवे ( ता. राधानगरी ) येथील गुरूकूल विनाअनुदानित दिव्यांग शाळेत सोशल सर्कल च्या माध्यमातून विद्यार्थ्याना कपडे व भोजनाचे वाटप करण्यात आले.समाजातील कोणताही घटक उपेक्षित न राहता सामाजिक न्याय देण्याचा दृष्टीने सोशल सर्कल सोसायटीच्या वतीने हा उपक्रम राबविणेत आला .
दिव्यांग मुलांना स्वेटर व रुचकर जेवणाचा स्वाद देण्यात आला,तसेच आमशी तालुका करवीर गावचे सुपुत्र योगेश पाटील यांचेकडून भोजन बनविण्यासाठी लागणारे विविध वस्तू भेट स्वरूपात देण्यात आल्या
या कार्यक्रमास कसबा वाळवेचे माजी सरपंच सुनील चव्हाण,सोशल सर्कल च्या अध्यक्षा सौ .फराकटे, सौ रोहिणी भोसले,सुभाष भोसले प्रशांत भोसले,संतोष चव्हाण, अमित उरणे , अशोक पाटील, रोहीणी पाटील, पूनम यादव व प्राजक्ता चव्हाण तसेच योगेश पाटील,शिवराज पाटील,अनिल पाटील,कृष्णात पाटील, रंजना पाटील,संजय भोईटे,जगदीश कणकेकर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय नीळपणकर यांनी केले तर स्वागत प्रास्ताविक सुशांत पाटील व आभार जितेंद्र कोठावळे यांनी मानले .