भावाशी मोठ्या मुलीचे लग्न लावून देण्याचे आमिष दाखवत घराशेजारील एका महिलेने दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याची घटना ६ डिसेंबर रोजी संजीवनगर, खाडी मोहम्मदिया मज्जिद, अंबड लिंकरोड येथे घडली. याप्रकरणी मुलींच्या आईने अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित नगमा समीउल्ला शेख, शौराब समीउल्ला शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला व नगमा शेख एकमेकांच्या परिचित आहेत. नगमा शेखा महिलेच्या घराशेजारी रहायला होती. तिने भाऊ शौराब शेख याच्याशी तुमच्या मोठ्या मुलीचे लग्न लावून देणार असल्याचे आमिष महिलेला दाखवले होते. त्यानंतर नगमा व शौराब शेख महिलेच्या दोन्ही अल्पवयीन मुलींना घेऊन फरार झाले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कोल्हे करत आहेत.