कुजलेल्या अवस्थेत आढळला युवतीचा मृतदेह

कुजलेल्या अवस्थेत आढळला युवतीचा मृतदेह

पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह टाकळा निर्जनस्थळी; पोलिसांना आव्हान

 

धारदार शस्त्राने डोक्यावर वार करत युवतीचा खून केल्यानंतर हल्लेखोराने पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह निर्जसनस्थळी फेकून दिल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी युवतीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह तपोवन-टाकळी रस्त्यावर आढळून आला आहे. या खुनामागील नेमके कारण आणि हल्लेखोरास शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी(दि. १२) दुपारी दोन वाजेच्या सुमारास पुर्वी मारुती वेफर्स समोरील कर्मा गॅलेक्सी इमारतीच्या पाठीमागील मोकळ्या मैदानात १७ ते २५ वयोगटातील अनोळखी युवतीचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. युवतीच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून तिचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. युवतीची ओळख पटू शकलेली नाही. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्ता पवार करत आहेत.

 

अभिप्राय द्या..